Join us

बिग बॉस, कॅरी मिनाटीची पोस्ट अन् भुवन बामची रिअ‍ॅक्शन; सोशल मीडिया झाला ‘सैराट’

By रूपाली मुधोळकर | Published: September 20, 2020 5:08 PM

फॅन्स म्हणाले, दिल जीत लिया भाई...

ठळक मुद्देनव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव नवे नाही. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर.

बिग बॉस’चे 14 वे सीझन लवकरच सुरु होतेय. साहजिकच यावेळी बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक स्पर्धकांची नावे चर्चेत आहेत. सर्वाधिक चर्चेत आहे ते युट्यूबर कॅरी मिनाटीचे नाव. कॅरी मिनाटी बिग बॉसच्या घरात जाणार, अशी चर्चा  जोरात होती. चर्चा सुरु होताच कॅरी मिनाटी टॉप ट्रेंड करत होता. पण आता कॅरीने स्वत:  एक पोस्ट करत या चर्चेला पूर्णविराम दिला. त्याची ही पोस्टही व्हायरल झाली आणि त्यावर लोकप्रिय युट्यूबर भुवन बाम याने दिलेली प्रतिक्रिया तर त्यापेक्षाही तुफान व्हायरल झाली.‘मी बिग बॉसमध्ये जात नाहीये. जे काही वाचाल, त्यावर विश्वास ठेवू नका,’ असे एक ट्विट कॅरी मिनाटीने केले.

कॅरीची पोस्ट अन् भुवन बामचे उत्तरमी बिग बॉसमध्ये जात नाहीये, अशी पोस्ट कॅरीने केली आणि पाठोपाठ त्याच्या या पोस्टवर लोकप्रिय युटयुबर भुवन बामची प्रतिक्रिया आली. ‘तू अगले साल भी जाएगा... जैसे मैं पिछले 4 साल से जा रहा हूं,’ असे भुवन बामने कॅरीच्या पोस्टवर उत्तर देताना लिहिले.

 इतकेच नाही अन्य युट्यूबर्स आशीष चंचलानी, स्टँडअप कॉमेडियन जीवेशू अहलूवालिया यांनीही यावर रिअ‍ॅक्ट केले.चाहत्यांनीही दिल्या मजेशीर प्रतिक्रियाकॅरीच्या पोस्टवर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. या प्रतिक्रिया तुम्ही खाली पाहू शकता.

कोण आहे कॅरी मिनाटी?

नव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव नवे नाही. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर. कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. फरीदाबादचा या अजयचे युट्यूबवरCarryMinati और ​​CarryIsLive अशी दोन चॅनल्स आहेत़युट्यूब करिअरसाठी कॅरीने मध्येच शिक्षण सोडले. होय, अगदी 12 वी परीक्षा न देण्याचा निर्णय त्याने घेतला. अर्थात पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले, हा भाग वेगळा.अजय नागर कॅरी मिनाटी नावाने युट्यूबवर लोकप्रिय आहे. युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी तो ओळखला जातो.वयाच्या 10 व्या वर्षापासून कॅरीने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणे सुरु केले होते. अगदी सुरुवातीला सनी देओलची मिमिक्री करणारा व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. 2014 मध्ये त्याने कॅरीमिनिटी हे मूळ युट्यूब चॅनल सुरु केले. 2017 मध्ये CarryIsLive आणखी एक युट्यूब चॅनल उघडले.कॅरीने जानेवारी 2019 मध्ये युट्यूबपर Pewdiepie विरोधात 'Bye Pewdiepie' नावाने एक डिस गाणे साद केले होते. ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. 24 तासांत या गाण्याला 5 मिलियन व्ह्युज मिळाले होते. 2019 या सालात टाईम मॅगझिनद्वारा नेक्स्ट जनरेशन लीडर्स 2019 व्या यादीत कॅरी दहाव्या क्रमांकावर होता. इनोव्हेटिव्ह करिअर करणा-या युवांची ही यादी टाईम मॅगझिन दरवर्षी प्रसिद्ध करते.

टॅग्स :बिग बॉसयु ट्यूब