Join us

सुशांत आत्महत्या प्रकरणात CBIच्या हाती लागला मोठा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 4:23 PM

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास आता ड्रग्सच्या अनुषंगाने सुरु झाला आहे. दरम्यान सीबीआयला या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा मिळाला असल्याचे समजते आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास आता ड्रग्सच्या अनुषंगाने सुरु झाला आहे. दरम्यान सीबीआयला या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा मिळाला असल्याचे समजते आहे. अद्याप सीबीआय अंतिम निष्कर्षावर पोहचलेली नाही. मात्र आता सुशांतला मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ देऊन जीवे मारण्यात आलं नाही ना, या दिशेने आता सीबीआयचा तपास सुरु झाला आहे. सीबीआयच्या चौकशीत सुशांतचा जिम ट्रेनर शमी अहमद आणि जुना ड्रायव्हर विरेंद्रने सुशांत ड्रग्स घेत असल्याचे नाकारले आहे. त्यांनी सांगितले की, सुशांत ड्रग्स घेतच नव्हता. जर ज्यूसमध्ये रिया किंवा तिचे लोक मिसळून देत असतील तर सांगू शकत नाही.

समय लाइव्हच्या रिपोर्टनुसार, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सुशांतचा जिम ट्रेनर शमी अहमदची सीबीआयने चौकशी केली त्यावेळी त्याने सांगितले की, सुशांत ड्रग्स घेत नव्हता. तो मित्राप्रमाणे प्रत्येक गोष्ट सांगायचा पण कधी ड्रगबद्दल बोलला नाही. जर कुणी ड्रग्सबद्दल सांगतंय तर ते खोटे आहे. सुशांतचा आधीचा ड्रायव्हर विरेंद्रने सीबीआय चौकशीत सांगितले की, तो देखील बराच काळ सुशांतसोबत होता पण सुशांत ड्रग घेत नव्हता. 

त्या खोलीच्या चावीच्या शोधात CBI

सीबीआय आता या गोष्टीचा तपास करत आहे की, अखेर त्या दरवाजाची चावी कुठे आहे जिथे सुशांतने आत्महत्या केली होती. सीबीआय सुशांतचा मित्र असल्याचा दावा करणाऱ्या संदीप सिंगलादेखील लवकरच चौकशीसाठी बोलवणार आहे. सीबीआयला त्याची भूमिका संशयास्पद वाटते आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबाबत मोठा खुलासा, सारा अली खानने रियाला अनेकवेळा ड्रग्स दिले

ड्रग डीलर्सशी सुशांतचा नव्हता संबंध

सीबीआय या अँगलनेदेखील तपास करत आहेत की सुशांतच्या नावाखाली रिया व तिचा भाऊ शोवित ड्रग्सचा खेळ तर खेळत नव्हते ना. कारण एनसीबीला आतापर्यंत चौकशीत कुठेही ड्रग डीलरने हे नाही सांगितले की, सुशांतचा त्याच्याशी संबंध होता किंवा त्यांना ओळखत होता. एनसीबीने 20हून अधिक ड्रग डीलरला अटक केली आहे. मात्र आतापर्यंत करमजीत, जैद आणि ऋषिकेश यांच्यासोबत रिया, शोविक, दीपेश सावंत आणि मिरांडा यांच्यासोबत संबंध असल्याचे कबूल केले पण सुशांतशी नाही. सीबीआय आता त्या फार्म हाउसचादेखील तपास करणार आहेत जिथे दिशाचा मृत्यू झाला होता.

तीन एजेंसी करतेय तपास

सीबीआयचे अधिकारी 20 ऑगस्टपासून मुंबईत आहेत. सीबीआय आणि एनसीबीशिवाय ईडीदेखील सुशांत आत्महत्या प्रकरणात मनी लॉड्रिंगचा तपास करत आहेत.

रिया चक्रवर्ती जेलमध्ये असे घालवत आहे दिवस

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज जाळ्याच्या तपास करणाऱ्या एनसीबीने मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक केली आहे. त्यानंतर कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता भायखळा तुरुंगात रिया आहे. दोन वेळा रियाचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. तिचे वकील सतीश मानेशिंदे आता मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात. त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस रियाच्या नशिबात भायखळा तुरुंगातील चटईवर झोपण्याची वेळ आली आहे. रियाला झोपण्यासाठी ना बेड, ना पंखा, ना उशी अशा अवस्थेत रिया दिवस घालवत आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभागरिया चक्रवर्ती