Join us

कास्टिंग डिरेक्टर कृष कपूरचं निधन, 28 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 12:10 PM

त्यांना कोणताच आजार नव्हता. ते पूर्णपणे फिट होते

संगीतकार वाजिद खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडला आणखी एक झटका लागला आहे. कास्टिंग डिरेक्टर कृष कपूर यांचं निधन झाले आहे, ते 28 वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झाला आहे. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी याचे खंडन केले. 

पीटीआयशी बोलताना कृष कपूर यांचे मामा सुनील भल्ला यांनी सांगितले की,मुंबईतल्या मीरारोडमधील घरी त्यांना अंतिम श्वास घेतला. ब्रेन हॅमरेज झाले आणि ते बेशुद्ध झाल. त्यांना कोणताच आजार नव्हता. ते पूर्णपणे फिट होते. 31 मे रोजी अचानक पडले आणि रक्त यायला सुरुवात झाली. ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला. 

कृष कपूर आपल्या मागे आई, पत्नी आणि सात वर्षांच्या मुलीला सोडून गेला आहे. कृष यांच्या मुख्य सिनेमांबाबत बोलायचे झाले तर महेश भट यांच्या 'जलेबी' सिनेमासाठी कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम केले होते. यात रिया चक्रवती आणि वरुण मित्रा मुख्य भूमिकेत होते याशिवाय कृति खरबंदा स्टारर 'वीरे की वेडिंग'चे कास्टिंग डिरेक्टर होते. 

टॅग्स :महेश भट