Join us  

​‘जग्गा जासूस’ मध्ये अशी दिसेल कॅटरिना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2016 5:56 PM

अनुराग बासू दिग्दर्शित करीत असलेला ‘जग्जा जासूस’ची चर्चा मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. चर्चेशिवाय हा चित्रपट पुढे सरकत नाही ...

अनुराग बासू दिग्दर्शित करीत असलेला ‘जग्जा जासूस’ची चर्चा मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. चर्चेशिवाय हा चित्रपट पुढे सरकत नाही अशी चर्चा सुरू असताना या चित्रपटाबाबत चांगली बातमी येत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, यातील कॅटरिनाचा पहिला स्टील फोटो समोर आला आहे. रणबीर कपूर व कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जग्गा जासूस’ची शूटिंग सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचा एक फोटो कॅटरिना कै फने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटहून शेअर केला आहे. या फोटोखाली तिने ‘बुद्धीमत्तेचे खरे प्रतिक ज्ञान असू शकते कल्पनाशक्ती नव्हे, हे खरे असू शकत नाही’ अशी कॅप्शन दिली आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोमुळे ‘जग्गा जासूस’ची शूटिंग जोमात सुरू असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. या फोटोमध्ये कॅटरिनाचा लूक जबरदस्त सेक्सी दिसतो आहे. तिने आपले केस समोर आणले असून डोळ्यांवर चष्मा लावला आहे, यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे.  तिने हा सेटवर फोटो काढला असून लाईट्सवर हात ठेवले आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरने या जग्गा जासूसच्या सेटवरचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. काही महिन्यांआधी ‘जग्गा जासूस’ची स्टोरी लिक झाली होती. यामुळे देखील हा चित्रपटाची चर्चा झाली होती. रणबीर कपूर आपल्या पालकांच्या मारेकºयांच्या शोधात मोरोक्कोत जातो अशी ती कथा असल्याचे सांगण्यात येते. कॅटरिना जग्गा जासूस सोबतच ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात सलमान खानच्या अपोझिट दिसणार आहे. 

The true sign of intelligence is not knowledge but imagination

Posted by Katrina Kaif on Friday, 18 November 2016