Join us  

रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 4:41 PM

रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरवर काही महिलांवर कार चढवण्याचा प्रयत्न व मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

Raveena Tandon Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिच्यावर एका वृद्ध महिलेसह इतर दोन महिलांवर कार चढवण्याचा प्रयत्न तसेच मारहाण केल्याचा आरोप आहे. रवीना टंडन दारूच्या नशेत होती, असा दावा करण्यात आला होता. आधी चालकाने तिन्ही महिलांवर कार चढवली आणि नंतर त्यांना मारहाण केली, असाही दावा केला जात आहे. मारहाणीत रक्तस्त्राव झाल्याचाही आरोप करण्यात आला. पण आता, रवीना टंडनच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये सारं चित्र स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.

रवीना टंडनच्या घराबाहेरील व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, शनिवारी 1 जून रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास महिलांचा एक गट तिच्या घराबाहेर जमला. एका सूत्राने 'न्यूज 18'ला सांगितले की, "ज्या प्रकारे ही घटना दाखवण्याचा दिखावा केला जात आहे, ते चुकीचे आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून असे सिद्ध होते की, त्यावेळी रवीना टंडनच्या घराबाहेर महिलांचा एक गट आला आणि त्यांनी ड्रायव्हरशी भांडण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रवीना ड्रायव्हरच्या बचावासाठी मध्ये आली. जर त्या महिला असा दावा करत आहेत की, ड्रायव्हरने कार अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला, मारहाणीचा प्रयत्न केला तर मग महिलांनी लगेच त्या वेळी पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर का दाखल केला नाही? बातम्यांमध्ये जे काही सांगितले जात आहे तसे काहीही घडलेले नाही. रवीना मद्यधुंद किंवा नशेमध्ये नव्हती. या महिलांवर ड्रायव्हरने हल्ला केल्याची कहाणी खोटी आणि रचलेली आहे."

पाहा CCTV फुटेज व्हिडीओ-

रवीना टंडनच्या ड्रायव्हरवर कार चढवण्याचा आरोप

मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दाव्यांनुसार, असे सांगितले जात आहे की रवीना टंडनचा ड्रायव्हर रिझवी कॉलेजजवळ कार्टर रोडवर रॅश ड्रायव्हिंग करत होता. त्याने तीन जणांना मारहाण केल्याचा आरोप आहे. रवीनाला याबाबत विचारले असता, अभिनेत्री मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला. ती त्या अवस्थेत कार बाहेर आली आणि पीडितांना शिवीगाळ करून त्यांच्याशी भांडू लागली असा आरोप करण्यात आला आहे.

टॅग्स :रवीना टंडनबॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरलमुंबई पोलीस