Cdr case : हृतिक रोशनचा नंबर शेअर केल्याच्या आरोपाने संतापली कंगना राणौत ! असा केला खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 8:13 AM
कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणामुळे अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सीडीआर प्रकरणात अटक करण्यात आलेला वकील ...
कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणामुळे अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सीडीआर प्रकरणात अटक करण्यात आलेला वकील रिजवान सिद्दीकी याला कंगनाने हृतिक रोशन याचा नंबर दिला होता, असे उघड झाले आहे. हृतिकचा सीडीआर मिळवण्यासाठी कंगणाने हा नंबर रिजवानला दिला होता का? याचा तपास सुरू असताना आता कंगनाच्यावतीने तिची बहीण रंगोली चंदेल हिने याबाबत खुलासा केला आहे. ‘कुठल्याही कायदेशीर नोटीसचे उत्तर द्यायचे म्हटल्यावर त्यासंदर्भातील सर्व माहिती वकिलाला पुरवली जाते. अशास्थितीत ही माहिती कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी वापरली जाईल किंवा एखाद्या कलाकाराची बदनामीसाठी तिचा वापर होईल, असे गृहित धरायचे का? अंदाज बांधण्याआधी योग्य तपास गरजेचा आहे,’ असे तिने म्हटले आहे. कंगना व हृतिक यांचा कायदेशीर वाद सगळ्यांना ठाऊक आहे. एका मुलाखतीत कंगनाने हृतिकला ‘सिली एक्स’ संबोधले होते. ‘तू हृतिक रोशनमुळे आशिकी-३ सोडला आहेस काय? असा प्रश्न या मुलाखतीत कंगनाला विचारला गेला होता. यावर, होय, मीदेखील अशाप्रकारच्या अफवा ऐकल्या आहेत. मला नाही माहीत की, माझा ‘सिली एक्स पार्टनस’ पब्लिसिटीसाठी अशाप्रकारच्या अफवा का पसरवितो? माझ्यासाठी आता तो चॅप्टर क्लोज झाला आहे, असे कंगना म्हणाली होती. कंगनाच्या या आरोपाला उत्तर देताना हृतिकने कंगनाला कायदेशीर नोटीस बजावले होते. त्यानंतर कंगना आणि हृतिकमध्ये ब्लेम गेमला सुरुवात झाली होती. यानंतर हा वाद चांगलाच विकोपाला गेला होता. ALSO READ : सीडीआर प्रकरणात कंगना राणौतचे नाव! जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफही अडचणीत!!काय आहे प्रकरण बेकायदेशीर कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात कंगना राणौत आणि जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ या दोघींची नावे समोर आली आहेत. कंगना व आयशा या दोघीही सीडीआर रॅकेटमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला वकील रिजवान सिद्दीकी याच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. रिजवान सिद्दीकी हा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा वकील आहे. तीन दिवसांपूर्वी त्याला सीडीआरप्रकरणी अटक करण्यात आली. डीसीपी (गुन्हे शाखा) अभिषेक त्रिमुखे यांनी काल मंगळवारी पत्रकारांशी बोलताना या तपासाचा खुलासा केला होता. सिद्दीकीचे फोन रेकॉर्ड तपासल्यानंतर आयशा श्रॉफ यांनी अवैधरित्या अभिनेता साहिल खान याचे सीडीआर काढले होते, असे समोर आले आहे. याप्रकरणी आयशा यांना समन्स बजावण्यात आला आहे. कंगना राणौत हिने सुद्धा हृतिक रोशनचा मोबाईल नंबर रिजवानसोबत शेअर केल्याचे पुरावे आहेत. हृतिकचा सीडीआर मिळवण्यासाठी कंगणाने त्याचा मोबाईल पाठवला होता का, याची चौकशी पोलीस करणार आहेत. त्यासाठी कंगणाला नोटीस बजावणार आहे, असे त्यांनी सांगितले होते.