Join us

सेलिब्रिटींनी दिली टिवटरवरून श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2017 8:05 AM

दमदार भूमिका साकारलेले अभिनेते विनोद खन्ना निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोशल मीडियावर सेलिब्रिटी दु:ख व्यक्त करत आहेत. उत्कृष्ट अभिनेता, ...

दमदार भूमिका साकारलेले अभिनेते विनोद खन्ना निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोशल मीडियावर सेलिब्रिटी दु:ख व्यक्त करत आहेत. उत्कृष्ट अभिनेता, हॅण्डसम हिरो गमावल्याचे दु:ख त्यांच्या टिवटमधून ते व्यक्त करत आहेत. श्रद्धा कपूर हॅण्डसम, उत्कृष्ट अभिनेता विनोद खन्ना यांना आज आपण गमावले आहे. मी नेहमीच त्यांनी फॅन असेन. तुमच्या आत्म्याला शांती लाभो.साजिद खानतुमच्या आत्म्याला शांती लाभो. तुमचे चित्रपटसृष्टीतील कार्य आमच्या सर्वांसाठी खुप मोलाचे ठरेल. तुमच्या अभिनयाची जादू दीर्घकाळ आमच्यासोबत असेल.बाबा सेहगल बेधडक आणि गुडलुकिंग अभिनेता विनोद खन्ना तुम्ही तुमच्या अभिनयाने संपूर्ण सृष्टीला मोहून टाकले आहे. तुमच्या आत्म्याला शांती लाभो.वरूण धवनभारतीय सिनेमा हा नेहमीच विनोद खन्नांच्या कारकिर्दीतल्या अभिनेत्यांमुळे ओळखला जातो. त्यांच्यासारखा कुल आणि गुडलुकिंग अभिनेता होणे नाही. खरंच तुम्हाला सॅल्युट. तुमच्या जाण्याने इंडस्ट्रीला मोठी हानी पोहोचली आहे.अक्षय कुमार विनोद खन्ना सर गेल्याचे कळताच मला फार वाईट वाटले. उत्साहवर्धक अभिनेत्यांपैकी एक ते होते. त्यांनी जो काळ गाजवला तो आता त्यांच्यासोबतच संपला आहे. त्यांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. करण जोहर विनोद खन्नांच्या जाण्याने त्यांची जागा भरून निघणार नाही. आम्ही लहानपणापासून त्यांचाच अभिनय पाहत आलो आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो...त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. रजनीकांत माझा प्रिय मित्र विनोद खन्ना...तुझी खुप आठवण येईल. मी त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. त्यांच्या दु:खात सहभागी आहे.शत्रृघ्न सिन्हा विनोद खन्ना खऱ्या  अर्थाने माझा जवळचा होता. मला पाठिंबा देणारा आणि माझे सर्वांत आवडते व्यक्तिमत्त्व आणि हुशार सुपरस्टार आता आपल्यात नाही. अभिषेक कपूर तुमच्या आत्म्याला शांती लाभो..तुमच्या आठवणी नेहमी स्मरणात राहतील. रिचा चढ्ढा विनोद खन्ना सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो. १९८०च्या दशकातील उत्तर भारतातील सर्व महिलांच्या स्वप्नातील तुम्ही राजकुमार होता. प्रत्येकाच्या मनात तुम्ही एक स्थान निर्माण केले होते. ते कायम राहील.ऋषी कपूरतु नेहमीच माझा ‘अमर’ राहशील मित्रा. तुझ्या आत्म्याला शांती लाभो.Sanjay dutt "It is saddening to hear of the demise of Vinod Khanna ji. I have watched him as a child and throughout my life was always fascinated by his style and charisma. He was always a thorough gentleman. A big loss to the fraternity. He is and always will be family to the Dutts. May his soul rest in peace. My deepest condolences to Kavita Bhabhi, Akshay, Rahul and Sakshi."संजय दत्त विनोद खन्ना यांच्या जाण्याने बॉलिवूडला खुप मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्टाईल, वागणुकीने मी नेहमीच प्रभावित होतो. माझ्यासाठी नेहमीच तो एक जंटलमॅन असणार आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.