सोशल मीडिया आता फक्त सोशल माध्यम राहिलेलं नसून पैसे कमविण्याचेदेखील माध्यम झाले आहे. इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या माध्यमांवर जाहिराती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतात. मोठ्या मोठ्या कंपनी सेलिब्रेटींना पैसे देऊन सोशल मीडियावर त्यांच्या प्रोडक्ट्सचे प्रमोशन करताना दिसतात. त्यासाठी सेलिब्रेटी चांगलेच पैसे घेतात. यामार्फत सेलिब्रेटींसाठी कमाईचे आणखीन एक साधन उपलब्ध झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रेटी एका पोस्टसाठी कोटींच्या घरात मानधन घेतात. त्यात सर्वात टॉप लिस्टवर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आहे. चला तर मग जाणून घेऊयात सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण किती कोटी रुपये घेतात
प्रियंका चोप्रा - १.८७ कोटी
बॉलिवूडची प्रियंका चोप्रा फोर्ब्सने जाहिर केलेल्या यादीमध्ये इंस्टाग्रामवर जास्त मानधन घेणारी सेलिब्रेटी आहे. प्रियंकाचे इंस्टाग्रामवर ४९ मिलियन फॉलोवर्स आहे. जीक्यूच्या रिपोर्टसनुसार, प्रियंका इंस्टाग्रामवर स्पॉन्सर्ड पोस्ट साठी १.८७ कोटी रुपये घेते.
आलिया भट - १ कोटी
बॉलिवूडची राझी गर्ल आलिया भटचे इंस्टाग्रामवर ४२.३ मिलियन फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडियावर नो मेकअप लूक, ट्रॅव्हेलिंग फोटो आणि सहकलाकारांसोबतचे फोटो शेअर करत असते. रिपोट्सनुसार ती स्पॉन्सर्ड पोस्टसाठी १ कोटी रुपये मानधन घेते.
शाहरूख खान - ८० लाख ते १ कोटी
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख बॉलिवूडमध्ये जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. शाहरूख खानही सोशल मीडियावर सक्रीय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे २० मिलियन फॉलोव्हर्स आहेत. तो प्रत्येक ब्रॅण्डच्या पोस्टसाठी ८० लाख ते १ कोटी रुपये घेतो.
अमिताभ बच्चन - ४० ते ५० लाख
सोशल मीडियावर जास्त करून तरूण वर्ग असला तरी बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन हेदेखील सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असतात. बिग बींचे इंस्टाग्रामवर १४ मिलियन फॉलोव्हर्स असून रिपोर्ट्सनुसार ते ४० लाख ते ५० लाख रुपये प्रत्येक पोस्टसाठी चार्ज घेतात.
शाहीद कपूर - २० ते ३० लाख
बॉलिवूडचा कबीर सिंग म्हणजेच अभिनेता शाहिद कपूरचे इंस्टाग्रामवर २४ मिलियन फॉलोव्हर्स असून तो स्पॉन्सर्ड पोस्टसाठी २० लाख ते ३० लाख रुपये घेतो.
नेहा धुपिया - १.५ लाख
नेहा धुपिया सध्या नो फिल्टर नेहा या शोचं होस्ट करते आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. रिपोर्ट्सनुसार ती प्रत्येक स्पॉन्सर्ड पोस्टसाठी दीड लाख रुपये घेते.