जाणून घेऊया कोणते सेलिब्रेटी 2018 मध्ये बनले माता-पिता
शाहिद कपूरशाहिद कपूरची पत्नी मीराने 5 सप्टेंबरला एका क्यूट मुलाला जन्म दिला. हे शाहिद आणि मीरा यांचे दुसरे मूल असून त्यांना मीशा ही मोठी मुलगी आहे. शाहिद आणि मीराने त्यांच्या मुलाचे नाव झेन असे ठेवले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्यांनी झेनच्या जन्माविषयी, त्याच्या नावाविषयी त्याच्या फॅन्सना सांगितले होते. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर छोट्याशा झेनचा फोटो देखील पोस्ट केला होता.
नेहा धुपिया-अंगद बेदीनेहा धुपिया आणि अंगद बेदीने मे महिन्यात गुपचुप लग्न केले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहा आणि अंगदने आपल्या मुलीचे नाव मेहर ठेवले. नेहा धुपियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक क्यूट फोटो शेअर केला आहे. नेहा लग्नाआधीच प्रेग्नंट होती. पण प्रेग्नंसीची गोष्ट तिने लपवून ठेवली होती. अखेर २४ आॅगस्टला नेहाने आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती.
सुनिधी चौहानसुनिधी चौहानच्या घरी 1 जानेवारीला चिमुकल्या परीचे आगमन झाले. सुनिधीने एप्रिल २०१२ मध्ये संगीतकार हितेश सोनिकशी लग्न केले होते. तिचे हे दुसरे लग्न असून वयाच्या अठराव्या वर्षी तिने दिग्दर्शक बॉबी खानसोबत लग्न केले होते. सुनिधी आणि हितेशने त्यांच्या मुलाचे नाव तेघ असे ठेवले आहे.
सनी लियोनीसनी लियोनी आणि पती डेनियल वेबरला सरोगसीच्या मदतीने जुळी मुलं झाली असल्याची तिने 4 मार्चला घोषणा केली. अशेर आणि नोरा अशी तिच्या मुलांची नावे असून तिने जुलैमध्ये निशा या चिमुकलीला दत्तक घेतले.
श्रेयस तळपदेश्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्तीला सरोगसीच्या माध्यमातून 4 मे ला मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव आद्या ठेवले आहे.
लिजा रेलिजा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने 2012 मध्ये जैसन देहनीसोबत लग्न केले होते. तिला सरोगसीच्या माध्यमातून दोन मुली झाल्या असून त्यांची नावे सूफी आणि सोलियल अशी आहेत.
गुल पनागगुल पनागला मुलगा झाल्यानंतर तिने सहा महिन्यानंतर ही गोष्ट मीडियाला सांगितली होती. गुलने आठ वर्षांपूर्वी ऋषी अटारीसोबत लग्न केले होते.