महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील आघाडीचे दैनिक लोकमतने महाराष्ट्राच्या मातीतील स्टायलिश पैलू हेरुन गेल्या काही वर्षापासून एका नव्या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे आयोजन दैनिक लोकमतच्या वतीने करण्यात येते. यंदा या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे. मराठी मातीत स्टाइलच्या प्रतिमेला पुरस्काराचे कोंदण देण्याच्या अभिनव कल्पनेने उभा महाराष्ट्र मोहरून गेला आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे. कारण विनय आहाना प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांना या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे. येत्या 19 नोव्हेंबरला हा सोहळा रंगणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड किंवा मग टीव्ही, फॅशन आणि उद्योग जगतातील कोणतीही व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी ठरु शकते. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभणार आहे.
बाजीराव मस्तानी, पद्मावत यासारख्या अनेक सिनेमांमुळे तरूणींच्या गळ्यातला ताईत बनलेला रणवीर सिंग आणि स्त्री सिनेमामुळे सध्या चांगलाच चर्चेत असलेला राजकुमार राव, टॉयलेट एक प्रेमकथा तसेच शुभ मंगल सावधान सिनेमातून लोकप्रिय ठरलेली भूमी पेडणेकर, तसेच धडक फेम जान्हवी कपूर आणि तापसी पन्नु , संगीतकार अजय-अतुल, गायक सोनु निगम यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी, मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट, स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर यांच्यासह दिग्गजांची या सोहळ्याला उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे आगळ्यावेगळ्या ठरणा-या या पुरस्कार सोहळ्याची सा-यांनाच उत्सुकता आणि प्रतीक्षा लागली आहे. तर लवकरच घेऊन येत आहोत अनोखा आणि रंगारंग पुरस्कार सोहळा.