Join us

'द बकिंगहॅम मर्डर्स' फेम अभिनेत्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत, चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 17:58 IST

अभिनेत्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे.

लोकप्रिय सेलिब्रिटी शेफ आणि अभिनेता रणवीर ब्रार हा कायम चर्चेत असतो. त्याचे स्वयंपाक कौशल्य तर सर्व परिचित आहेच. पण त्याचा अभिनयदेखील अलिकडे प्रदर्शित झालेल्या 'द बकिंगहॅम मर्डर्स' या चित्रपटात पाहायला मिळाला.  मास्टरशेफ आणि अभिनेता असलेला रणवीर हा वैयक्तिक आयुष्यात आव्हानांना तोंड देत आहे.

 रणवीरला पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. पिंकव्हिलानुसार, त्याच्या मणक्यातील सी6 और सी7मध्ये फ्रॅक्चर झाले आहे. या दुखापतीमुळे त्याला ३ आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. रणवीरच्या तब्येतीचे अपडेट समोर आल्यानंतर त्याचे चाहते थोडे चिंतेत पडले आहेत. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते हळूहळू बरा होत आहेत.

रणवीर ब्रार मास्टरशेफ इंडियाच्या सीझन 4, 6 आणि 7 मध्ये जज होता. याव्यतिरिक्त, त्याने फेम फूडीज आणि थँक गॉड इट्स फ्रायडे मध्ये काम केले आहे.  भारतातील यशस्वी शेफच्या यादीत त्याचा समावेश केला जातो.  रणवीरने 2022 साली प्रदर्शित झालेल्या मॉडर्न लव्ह या वेब सीरिजमधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने करीना कपूर खानच्या  'द बकिंगहॅम मर्डर्स'  या चित्रपटातही काम केले. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड