सेलिब्रिटींचा केमिओ; प्रेक्षकांना ओळखणे झाले कठीण!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 1:23 PM
काही जणांना एखादा छोटासा रोल मिळतो आणि ते त्यातच खूश होऊन जातात. कधी कधी एखादा केमिओ त्यांना करायला मिळतो. हजारांच्या संख्येत तो एक चेहरा प्रेक्षकांना ओळखूही येत नाही. आत्तापर्यंत असं अनेकदा झालंय की, आज जो एक कलाकार मोठा स्टार आहे, त्याने कधी काळी एक केमिओचा रोल केला होता.
अबोली कुलकर्णीबॉलिवूडमध्ये काम मिळणं खरंतर खूप कठीण. त्यासाठी लागणारी मेहनत, कष्ट जरी तुम्ही घेतले तरी मनासारखे काम काही मिळत नाही. काही जणांना एखादा छोटासा रोल मिळतो आणि ते त्यातच खूश होऊन जातात. कधी कधी एखादा केमिओ त्यांना करायला मिळतो. हजारांच्या संख्येत तो एक चेहरा प्रेक्षकांना ओळखूही येत नाही. आत्तापर्यंत असं अनेकदा झालंय की, आज जो एक कलाकार मोठा स्टार आहे, त्याने कधी काळी एक केमिओचा रोल केला होता. पाहूयात मग, असे कोणकोणते चित्रपट आहेत ज्यात बॉलिवूडच्या कलाकारांनी केमिओ केले पण, त्यांना प्रेक्षकांनी ओळखलेच नाही. पहला नशाराहुल रॉय आणि सुदेश बेरी यांच्या ‘पहला नशा’ या चित्रपटात एका सीनसाठी सैफ अली खान, शाहरूख खान आणि आमिर खान हे एकत्र आलेले दिसले. काही क्षणांसाठीच ते पडद्यावर होते पण त्यांच्याकडे काही प्रेक्षकांचे लक्ष जात नाही. कयामत से कयामत तकआमिर खानची पहिली पत्नी रिना दत्ता ही ‘पापा कहते हैं’ या चित्रपटात एका गाण्यादरम्यान दिसली होती. एका क्षणांसाठी दिसलेली रिना अगदी प्रेक्षकांना ओळखूही येत नाही. दिल तो पागल हैंबॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर याने सध्या त्याचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. पदमावत, कमिने, हैदर अशा एक ना अनेक चित्रपटांनी त्याने त्याचा अभिनय दाखवून दिला. मात्र तुम्हाला माहितीये का की, शाहिदने त्याच्या करिअरच्या सुरूवातीला अनेक म्युजिक व्हिडीओज, बॅकअप डान्सर म्हणून काम पाहिले. दिल तो पागल है आणि ताल चित्रपटात त्याने के लेला केमिओ कुणाच्याही लक्षात आला नाही. मुन्नाभाई एम.बी.बी.एस.अनुष्का शर्मा हे इंडस्ट्रीतलं आता व्हर्सेटाईल नाव झाले आहे. अभिनय, निर्मिती अशा प्रत्येक क्षेत्रात तिने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. मात्र तिने जेव्हा करिअरला सुरूवात केली तेव्हा मात्र, तिचा केमिओ कुणीही ओळखला नाही. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात एका सीनमध्ये ती एके ठिकाणी दिसते. पण तिच्याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. कभी अलविदा ना कहनाशाहरूख खान, राणी मुखर्जी, प्रिती झिंटा, अभिषेक बच्चन यांचा म्युजिकल हिट चित्रपट म्हणजे कभी अलविदा ना कहना. चारही कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन यांना प्रेक्षकांनी दाद दिली. मात्र, ‘तुम्ही देखो ना’ या गाण्यात दिग्दर्शक अयान मुखर्जी देखील यात एका ठिकाणी दिसतो. पण, तो बिल्कुल ओळखू येत नाही. कुछ कुछ होता हैंगीता कपूरचे नाव घेतले की, डोळयासमोर येतो एक रिअॅलिटी शो. मात्र, तिने एका चित्रपटात कामही केले आहे. कुछ कुछ होता हैं मधील ‘तुझे याद ना मेरी आयी’ या गाण्यात गीता दिसते आहे. या गाण्याची कोरिओग्राफी तिने केली आहे.