Join us

...या सेलिब्रिटींचा शेजार अजिबातच नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2017 11:16 AM

बॉलिवूड सेलिब्रिटींची एक झलक जरी बघायला मिळाली तरी, तो क्षण आयुष्यभर स्मरणात राहतो; मात्र या सेलिब्रिटींच्या शेजाºयांना यांची झलक ...

बॉलिवूड सेलिब्रिटींची एक झलक जरी बघायला मिळाली तरी, तो क्षण आयुष्यभर स्मरणात राहतो; मात्र या सेलिब्रिटींच्या शेजाºयांना यांची झलक तर सोडाच यांचा शेजारही नकोसा झाला आहे. शाहरूख खान, सलमान खान, शाहिद कपूर, शक्ती कपूर यांच्यासह बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांना त्यांचे शेजारी अक्षरश: उबगले आहेत. दररोजच्या पार्ट्या, दारू-नाचगाणे यासह कर्णकर्कश डीजेच्या आवाजांमुळे या सेलेब्सनी शेजाºयांचे जगणे मुश्कील केले आहे. विशेष म्हणजे यांना जेव्हा-जेव्हा हटकले गेले तेव्हा स्टार पॉवरच्या बळावर त्यांनी शेजाºयांशी पंगाही घेतला आहे. अशाच सेलिब्रिटींच्या कारनाम्यांवर आधारित हा स्पेशल रिपोर्ट...!- अखेर पोलिसांनी पार्टी थांबविली२०१६ मधील ही घटना आहे. ‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी अभिनेत्री करिना कपूर हिने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना घरी आमंत्रित केले होते. या सेलिब्रिटींना रात्री उशिरापर्यंत मद्यपान करून डीजेच्या तालावर ठेका धरला होता. कर्णकर्कश डीजेच्या आवाजात ही सेलिब्रिटींचा उतपात शेजाºयांची झोपमोड करणारा होता. अखेर शेजाºयांनी पोलिसांना याविषयी माहिती देऊन पार्टी थांबवायला लावली होती. - सलमानला भरावा लागला बाराशे रुपयांचा दंडसलमान खान याचेही शेजारी त्याला वैतागले आहेत. २०१० मध्ये तर त्याला याच कारणामुळे बाराशे रुपयांचा दंडही भरावा लागला होता. त्याचे झाले असे की, सलमानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर वॅनिटी व्हॅन उभी करण्यावरून त्याच्या शेजाºयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. यावेळी त्याला बाराशे रुपयांचा दंड आकारला होता. - रणबीरवर केली पोलिसांत तक्रार अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर त्याच्या बांद्रा येथील अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला होता. याठिकाणी तो रोजच त्याच्या काही बॉलिवूड मित्रांना बोलावून पार्ट्या सेलिब्रेट करीत होता. नशा व गोंधळामुळे त्याचे शेजारी अक्षरश: वैतागले होते. अखेर त्यांनी रणबीर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. - शक्ती कपूर शेजाºयांसाठीही खलनायकबॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा शक्ती कपूर याचे जुहू स्थित सोसायटीमधील शेजारी त्याच्या विचित्र कारनाम्यामुळे त्रस्त आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्या लिफ्टमध्ये लघवी केल्याचा आरोप करण्यात आला होता. एकदा तर तो बिल्डिंगमधील कॉरिडोरमध्ये न्यूड होऊन पळताना बघण्यात आला होता. विशेष म्हणजे एका मुलाखतीदरम्यान शक्तीने याबाबतची कबुलीही दिली होती. प्रीतीचा गर्विष्ठपणा२०१५ ची गोष्ट आहे. अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्या गर्विष्ठ स्वभावामुळे तिचे शेजारी वैतागले होते. सूत्रानुसार, प्रीती बिल्डिंग कम्पाउंड, स्विमिंग पूल आणि जिम एरियामध्ये स्वत:चीच मनमानी करीत होती. जेव्हा ती याठिकाणी असायची तेव्हा तिचे बाउन्सर्स इतरांना त्याठिकाणी जाऊ देत नव्हते. अखेर प्रीतीविरोधात बिल्डिंगमधील सर्व रहिवाशांची एकजूट झाली होती. ऐश्वर्याच्या घरी सलमानचा धिंगाणाअभिनेत्री ऐश्वर्या आणि तिचा एक्स बॉयफ्रेण्ड सलमान खान यांच्यात जेव्हा वाद झाला होता तेव्हा सलमान तिच्या घरी जाऊन धिंगाणा घालत होता. याठिकाणी येऊन तो तासन्तास तिचा दरवाजा ठोकत असे. रात्री-बेरात्री त्याचा हा उद्योग सुरू असल्याने शेजारी अक्षरश: वैतागले होते. अखेर त्यांनी याविषयी पोलिसांत तक्रार दिली होती. शाहरूखची मनमानीशाहरूख खान यानेदेखील लोकांना त्रास देण्याची संधी सोडली नाही. त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या वॅनिटी व्हॅनला जागा करण्यासाठी त्याने अवैधरीत्या रॅम्प बांधला होता. ज्यामुळे त्याठिकाणी प्रचंड ट्रॅफिक जाम व्हायची. शेजारील वाहनांना तर तेथून जाणे मुश्कील झाले होते. अखेर लोकांनी रस्त्यावर उतरून त्याचा विरोध केला होता. गेल्यावर्षी बीएमसीने हा रॅम्प तोडला. आदित्यनी केली शेजाºयाला मारहाण२०१३ मध्ये झालेल्या पार्किंग वादानंतर आदित्य पंचोली याने एका ५५ वर्षीय शेजाºयाला मारहाण करीत त्याचे नाक फ्रॅक्चर केले होते. त्यानंतर आदित्यने माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. शाहिदने घेतला पंगा२०१५ मध्ये अभिनेता शाहिद कपूर याच्या जुहू स्थित सी-फेसिंग बंगल्यात कित्येक महिने इंटेरियर आणि रिन्यूव्हेशनचे काम सुरू होते. त्यामुळे दररोजच्या कल्लोळामुळे शेजारी वैतागले होते. शिवाय याठिकाणी येणारे कामगार हे शेजाºयांच्या भितींवर लघुशंका करीत असल्याने दुर्गंधी निर्माण झाली होती. अखेर शेजाºयांनी शाहिदविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. डॉलीने केली शिवीगाळ २०१४ मध्ये मलाड स्थित भूमी हाउसिंग सोसायटीमधील शेजाºयांनी डॉली बिंद्रा हिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यावेळी शेजाºयांनी तिच्यावर आरोप केला होता की, डॉली बºयाचशा शेजाºयांना शिवीगाळ करते. डॉलीच्या या स्वभावामुळे सोसायटीमधील रहिवासी त्रस्त झाले होते. डॉलीच्या भीतीमुळे हे रहिवासी आपल्या मुलांना गार्डन एरियातही खेळण्यासाठी पाठवित नव्हते.