भारतातील सर्वात मोठे बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याने १२ जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्न केले. या शाही लग्नात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. दरम्यान, अंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी हाय-प्रोफाइल सेलिब्रिटींना पैसे देण्यात आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Panday)ने यावर मौन सोडले आहे.
मॅशेबल इंडियाच्या मुलाखतीदरम्यान, अनन्या पांडेला अनंतच्या लग्नाच्या मिरवणुकीत जोमाने नाचण्याबद्दल विचारण्यात आले. यावर अनन्याने उत्तर दिले की, 'तो माझा मित्र आहे. लोक असे का विचार करतात ते मला समजत नाही. अर्थात माझ्या मित्रांच्या लग्नात मी मनापासून नाचणार. मला प्रेम साजरे करायला आवडते.
अनंत-राधिकाच्या नात्यावर म्हणाली...यादरम्यान अनन्याने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या नात्याबद्दलही सांगितले. ती म्हणाली की, लग्नाची एक मोठी गोष्ट म्हणजे खूप काही घडत होतं, पण जेव्हाही अनंत आणि राधिकाने एकमेकांना पाहिलं तेव्हा ते निव्वळ प्रेम होतं. त्यांच्या मागे व्हायोलिन वाजवल्यासारखं वाटत होतं. ही गोष्ट मला आयुष्यात हवी आहे. आजूबाजूला कितीही गोंधळ गडबड असेल तरी तुमचं आणि त्या व्यक्तीचं ते नातं शेअर होतं.
अंबानी कुटुंबाचे आयोजन केल्याबद्दल कौतुकअनन्या पांडेने पुढे अंबानी कुटुंबाच्या होस्टिंगचे कौतुक केले. अभिनेत्री म्हणाली की, त्यांनी सर्वांचे स्वागत केले. कितीही कार्यक्रम झाले तरी त्यांनी सर्वांचे मोठ्या प्रेमाने आणि जिव्हाळ्याने स्वागत केले. हा एक सुंदर गुण आहे कारण यामुळे प्रत्येक गोष्टीत आपलेपणा वाटतो.
अनन्या पांडे अलीकडेच 'कॉल मी बे' या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेली ही मालिका प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली.