सेन्सॉरचे ‘संस्कारी’ अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे वाचा वादग्रस्त निर्णय !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 03:02 PM2017-08-11T15:02:54+5:302017-08-11T21:04:05+5:30

आपल्या हेकेखोरपणामुळे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरत असलेले सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांची अखेर गच्छंती करण्यात आली असून, या पदाची ...

Censor's 'Sanskriti' President Prajayaj Nihalani's controversial decision! | सेन्सॉरचे ‘संस्कारी’ अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे वाचा वादग्रस्त निर्णय !

सेन्सॉरचे ‘संस्कारी’ अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे वाचा वादग्रस्त निर्णय !

googlenewsNext
ल्या हेकेखोरपणामुळे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरत असलेले सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांची अखेर गच्छंती करण्यात आली असून, या पदाची धुरा आता प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांच्यावर सोपविली जाणार आहे. चित्रपटांना सर्टिफिकेट देण्यावरून अन् सीन्सला कात्री लावण्यावरून नेहमीच चर्चेत राहणाºया निहलानी यांचे बरेचसे निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. हाच त्यांच्या वादग्रस्त निर्णयाचा आढावा घेणारा हा वृत्तांत...



१) उडता पंजाब : शाहिद कपूर स्टारर ‘उडता पंजाब’ या चित्रपटामुळे पहलाज निहलानी सर्वाधिक वादग्रस्त ठरले. निहलानी आणि त्यांच्या कमिटीने या चित्रपटातील तब्बल ४२ सीन्सला कात्री लावण्याचे आदेश दिले होते. पुढे हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. अखेर न्यायालयाने निर्मात्यांच्या बाजूने निकाल दिला. 



२) जेम्स बॉन्ड : बॉलिवूडबरोबर हॉलिवूडपटांनाही ‘संस्कारी’ करण्याचा पहलाज निहलानी यांनी निर्णय घेतला. वास्तविक त्यांचा हा निर्णय आश्चर्यकारकच होता. ‘जेम्स बॉन्ड’ या हॉलिवूडपटातील अनेक सीन्सला त्यांनी कात्री लावली. त्यावेळी त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात आली. 



३) लिपस्टिक अंडर माय बुरखा : काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास पहलाज निहलानी यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. पहलाज यांच्या या अजब निर्णयामुळे इंडस्ट्रीत आश्चर्य व्यक्त केले गेले. अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. अखेर ‘ए’ सर्टिफिकेट देऊन हा चित्रपट रिलीज करण्यात आला. 



४) जब हॅरी मेट सेजल : नुकत्याच रिलीज झालेल्या शाहरूख खान याच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातील इंटरकोर्स या शब्दावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पहलाज निहलानी यांचा हा निर्णय हास्यास्पद समजला गेला. 



५) इंदू सरकार : मोदी सरकार येताच पहलाज निहलानी यांची सेन्सॉरच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. अशात त्यांनी ‘इंदू सरकार’ला समर्थन दिल्याने त्यांच्यावर कॉँग्रेसकडून आरोप करण्यात आले होते. नेहमीच चित्रपटांना कात्री लावणाºया पहलाज निहलानी यांचे ‘इंदू सरकार’ला समर्थन आश्चर्यकारक असल्याचा आरोप कॉँग्रेसकडून करण्यात आला होता. 



६) बाबूमोशाय बंदूकबाज : नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटातील तब्बल ४८ सीन्सवर कात्री लावण्याचा अजब निर्णय पहलाज निहलानी यांनी घेतला. यावेळी चित्रपटाच्या निर्मात्यांशी सेन्सॉरच्या कमिटीने चुकीची वागणूक दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. 



आयफामध्ये उडविली खिल्ली
न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या ‘आयफा २०१७’ मध्ये सीबीएफसी अध्यक्ष पहलाज निहलानी यांची खिल्ली उडविण्यात आली. जेव्हा ही बाब त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी आयफा आयोजकांना कायदेशीर नोटीस बजावली होती. निहलानी यांनी आरोप केले होते की, रितेश देशमुख आणि मनीष पॉल यांनी त्यांच्या फोटोंचा दुरुपयोग केला होता. त्यांना वॉचमन असेही म्हटले होते. 

Web Title: Censor's 'Sanskriti' President Prajayaj Nihalani's controversial decision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.