Join us  

चाहत फतेह अली खानचं 'बदो बदी' गाणं युट्यूबवरुन डिलीट, काय आहे नेमकं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 10:35 AM

गाणं हटवल्याने नेटकरीही भलतेच खूश झालेत.

पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खानच्या (Chahat Fateh Ali Khan)  'बदो बदी' (Bado Badi) या गाण्याने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला. त्यांच्या म्युझिक व्हिडिलाही प्रचंड ट्रोलही करण्यात आलं. एकापेक्षा एक मीम्स या गाण्यावर बनले. आता अखेर हे गाणंच युट्यूबवरुन डिलिट करण्यात आलं आहे. कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गाण्याला युट्यूबवरुन हटवण्यात आलं आहे. 

चाहता फतेह अली खान यांच्या 'बदो बदी' गाण्याला फारच निगेटिव्ह पब्लिसिटी मिळाली होती. गाणं तर व्हायरल झालं पण केवळ नावं ठेवण्यासाठी. सोशल मीडियावर गाणं केवळ मीमचा विषय बनलं होतं. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात गाण्याची खिल्ली उडवली गेली. तर अनेकांनी यावर रील्सही बनवले. मात्र आता Youtube वर कॉपीराईट स्ट्राईक आल्यामुळे हे गाणं हटवण्यात आलं आहे. गाण्याला एका महिन्यातच युट्यूबवर 128 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. 'डेक्कन हेराल्ड'च्या रिपोर्टनुसार, गाण्याचे बोल हे नूरजहां यांच्या 1973 साली आलेल्या 'बनारसी ठग'मधील गाण्यावरुन घेण्यात आले होते. 

चाहत फतेह अली खान हे नाव लॉकडाऊनवेळी गाजलं. सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यांनी रेकॉर्ड रचलं. मीम्सचा पाऊसच आला. आता हे गाणंच डिलिट केल्याने नेटकरीही खूश झालेत. 'बरं झालं कंटाळाच आला होता','बदो बदीने वेड लावलं होतं चांगलंच झालं डिलीट केलं' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :संगीतपाकिस्तानयु ट्यूबसोशल मीडिया