Join us

Urfi Javed Controversy : चाहत खन्नाचा चेतन भगतला पाठिंबा, म्हणाली ' हे तर खुपच चांगले शब्द वापरले...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 12:35 PM

उर्फीवर टीका करणारे चेतन भगत हे पहिले सेलिब्रिटी नाहीत. यापुर्वीच टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने उर्फी वर निशाणा साधला होता. आता परत तिने चेतन भगतला पाठिंबा देत उर्फीवर टीका केली आहे.

Urfi Javed Controversy : सोशल मीडीया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या स्टाईलवरुन ट्रोल होतेच. पण आता सेलिब्रिटी सुद्धा तिच्यावर टीका करत आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी  उर्फीवर केलेल्या टीकेवरुन वाद सुरु झाला. उर्फीनेही चेतन भगत यांना सडेतोड उत्तर दिले पण उर्फीवर टीका करणारे चेतन भगत हे पहिले सेलिब्रिटी नाहीत. यापुर्वीच टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने उर्फी वर निशाणा साधला होता. आता परत तिने चेतन भगतला पाठिंबा देत उर्फीवर टीका केली आहे.

चाहत खन्ना ने याआधीच उर्फीवर टीका केली होती. ही महिला किती मजेदार आहे. कोणी तुम्हाला गमतीत फॅशन आयकॉन म्हणले म्हणजे तुम्ही खरंच होत नाही. आता चाहत खन्ना चेतन भगतला पाठिंबा देत म्हणाली,'बरे झाले कोणीतरी या विषयावर बोलायला सुरुवात केली. आनंद आहे याला विरोध होत आहे, उर्फी तरुणांची दिशाभुल करत आहे, त्यांना बिघडवत आहे असे प्रसिद्ध लेखक म्हणाले. हे तर फार चांगल्या शब्दात तिचे कौतुक झाले आहे. उर्फी तर याहुन मोठ्या गोष्टी करत आहे. मला तर त्यांच्या वक्तव्यात काहीच चुक वाटले नाही.'

चाहतच्या या टीकेवर उर्फी कशी शांत बसेल. उर्फीने चाहतला रोखठोक उत्तर देत म्हणाली, 'जेव्हा तुझी मुलगी उद्या मोठी होईल आणि तिच्या कपड्यांवरुन कोणी तिला हिणवेल तेव्हा तु तुझे हे स्टेटमेंट लक्षात ठेव. तुझ्या मुलांना हे विधान दाखव. मी कोणते कपडे घालत आहे तु त्यावर बोलत आहेस. तुझी द्वेषाची भावना तुलाच खात आहे. कमीत कमी तुझ्या मुलांसाठी तरी तुझे विचार बदल. पुरुष जे करतात ते महिलांमुळे करतात या विचारांना प्रोत्साहन देणे बंद करा. '

उर्फी पुढे म्हणाली, 'माझ्या छोट्या कपड्यांमुळे तु माझा द्वेष करत नाहीस कारण तु सुद्धा छोटे कपडे घालते. पण तुला कोणी विचारतच नाही. इन्स्टाग्रामवर तुझे बिकीनीमधले फोटो आहेत. माझ्यावर जसे लोकांचे लक्ष जाते तसे तुझ्यावर जात नाही ही तुझी खरी अडचण आहे. त्यामुळे आता माझ्या नावावर प्रसिद्धी घेणे बंद कर. तुला माहिती आहे की तु माझ्याबद्दल बोलणे बंद केले तर मीडिया पेजेस वर तुझ्याबद्दल काही पोस्ट येणार नाही. तुला माझ्यामुळेच लाईमलाईट मिळत आहे. बघ तु कशी क्लीवेज दाखवत हातात गुची बॅग घेऊन मटकती आहे. आरशाचे घर बाबू भैय्या.'

उर्फीवरुन आणि सेलिब्रिटींमध्ये होणारा वाद काही थांबणार नाही असेच दिसत आहे. मात्र उर्फी सुद्धा तिची स्टाईल काही सोडत नाही आणि तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते. 

टॅग्स :सोशल मीडियाफॅशनटिव्ही कलाकारट्रोल