चक दे इंडिया हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या चित्रपटातील सगळीच गाणी लोकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात एक वेगळा शाहरुख प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. त्याने या चित्रपटात कबीर खान ही व्यक्तिरेखा साकारली असून तो मुलींच्या हॉकी टीमचा कॅप्टन असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.
शाहरुख खान वगळता या चित्रपटातील इतर अनेक कलाकार हे नवीन होते. महिला हॉकी टीमचा विश्वविजेता पदापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाला होता. त्यामुळे या चित्रपटात महिला कलाकारांची संख्या खूपच जास्त होती. हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आता जवळजवळ ११ वर्षं झाले आहेत. या चित्रपटातील अनेक कलाकार आता बॉलिवूडपासून दूर आहेत. या चित्रपटात आलिया बोस ही व्यक्तिरेखा अनाइता नायर या अभिनेत्रीने साकारली होती. अनाइताचा चक दे हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. त्याआधी तिने बाय द पीपल या मल्याळम चित्रपटात काम केले होते. चक दे इंडिया या चित्रपटामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिने यानंतर वेल डन अब्बा, आशाये, झुठा ही सही, फोर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या फोर्स या चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात झळकली नाही. अनाइता ही सध्या बॉलिवूडपासून दूर असून तिचे वैवाहिक आयुष्य आनंदात जगत आहे.
अनाइताने २०११ मध्ये लग्न केले आणि ती तिच्या पतीसोबत सिंगापूरला स्थायिक झाली. गेली कित्येक वर्षं ती सिंगापूरमध्येच राहात आहे. तिथे हेअर स्टायलिस्ट म्हणून ती काम करते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही तिच्या फॅन्सच्या संपर्कात आहे. ती तिच्या कुटुंबियांचे, तिने केलेल्या हेअर स्टाइलचे फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करत असते. तिला एक मुलगी असून तिचे नाव आलिया आहे. अनाइताचे चक दे इंडिया या चित्रपटात आलिया हे नाव असल्याने तिने तिच्या व्यक्तिरेखेवरून तिच्या मुलीचे नाव ठेवले आहे.