अक्षय खन्ना व रिचा चड्ढा अभिनीत 'सेक्शन ३७५' चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केलं आहे. या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...
- तेजल गावडे
'सेक्शन ३७५'वर चित्रपट बनवावासा का वाटला?'सेक्शन ३७५' चित्रपटाची स्क्रीप्ट लेखक मनीष गुप्ता यांनी लिहिलेली होती. ती स्क्रीप्ट मला चांगली वाटली. त्यामुळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं ठरविले. अक्षय खन्ना व रिचा चड्ढाने चित्रपट आधीच साईन केला होता. 'सेक्शन ३७५'ची बऱ्याचदा समाजात चर्चा होताना पहायला मिळते. त्यामुळे मनोरंजनासोबत लोकांना त्यातून काही माहिती मिळणार असेल, तर ही चांगली बाब आहे.
या चित्रपटाचा अनुभव कसा होता?खूपच चांगला अनुभव होता. चित्रपटाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये खूप मजा आली. स्क्रीप्ट तयार होती पण सुरूवातीला कोणताही दिग्दर्शक त्याच्या दृष्टीकोनातून स्क्रीप्टमध्ये थोडाफार बदल करतो. त्यामुळे मला चार-पाच महिने स्क्रीप्ट लिहण्यासाठी वेळ गेला. त्यानंतर जानेवारीपासून चित्रीकरणाला सुरूवात केली.
या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगाल?हा सिनेमा कोणा एकाची बाजू घेत नाही आहे. ८-९ प्रकरणाचा या चित्रपटासाठी थोडाफार संदर्भ घेण्यात आला आहे. कायद्यासोबतच न्यायालयीन प्रक्रियाही चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. बऱ्याच लोकांना बलात्काराचे मायने माहित नाही. निर्भया केसनंतर 'सेक्शन ३७५'मध्ये बदल करण्यात आला. या संदर्भातील बऱ्याच गोष्टी चित्रपटात पहायला मिळणार आहेत.