सुशांत सिंग राजपूतचा ‘सोन चिरैय्या’ प्रदर्शनापूर्वीच वादात!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 02:22 PM2019-02-21T14:22:56+5:302019-02-21T14:23:26+5:30
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘सोन चिरैय्या’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘सोन चिरैय्या’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. होय, चंबळच्या लोकांनी या चित्रपटाला विरोध केला असून निर्माता व दिग्दर्शकाला नोटीस बजावले आहे.
पेशाने वकील असलेले राजेंद्र सिंग यांनी हे नोटीस पाठवले असून या चित्रपटातून चंबळची प्रतिमा मलीन करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
१९७० च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या या चित्रपटात चंबळ खोºयातील दरोडेखोरांचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. आणीबाणीनंतर चंबळ खोºयात दहशत निर्माण करणा-या या दरोडेखोरांचे आयुष्य अचानक बदलते, असे या चित्रपटाचे ढोबळ कथानक आहे.
काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या चित्रपटातून चंबळची प्रतिमा मलीन करण्यात येत असल्याचा आरोप आणि चंबळला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. चित्रपटाच्या प्रचारादरम्यान ‘चंबळ टुरिज्म’ या शब्दाचा वापर करून दरोडेखोर, बंदूक, हिंसा, अपहरण दाखवण्यात आले आहे, यावरही लोकांचा आक्षेप आहे.
सुशांत सिंह राजपूत,भूमी पेडणेकर, अशुतोष राणा, मनोज वाजपेयी आमि रणवीर शौरी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. येत्या १ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.