Join us

‘चांद्रयान 3’च्या यशस्वी लँडिंगचा चित्रपट येणार, मिशन मंगलचे दिग्दर्शक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 16:53 IST

बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला. आता या ‘चांद्रयान 3’वर सिनेमा येणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

 23 ऑगस्ट, हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे. भारताचा महत्वकांशी प्रकल्प, चंद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल देशभरातून इस्रो(ISRO) च्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले जात आहे.आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनला आहे. इस्त्रोच्या या यशानंतर देशात जल्लोषाचं वातावरण आहे. बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला. यादरम्यान आता अशी माहिती समोर येतेय की, ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांनी ‘चांद्रयान 3’च्या यशाला मोठ्या पडद्यावर दाखवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक भास्करशी बोलताना जगन शक्ती म्हणाले, मला ही संधी मला जाऊ द्यायची नाही. मी यावर आता विचार करतोय. यावेळी बोलताना त्यांनी हेही स्पष्ट केलं की यात मिशन मंगल’मधील कलाकारांचीच वर्णी लागू शकते.  मिशन मंगल या चित्रपटात अक्षय कुमारसोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, क्रिती कुल्हारी यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे ‘चांद्रयान 3’वरील चित्रपटातसुद्धा अक्षयची वर्णी लागते का हे पाहवं लागले. 

जगन शक्ती यांनी सांगितलं की त्यांची मोठी बहीण इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे. त्यामुळे ‘चांद्रयान 3’बाबत ते बहिणीकडून सर्व माहिती घेत आहेत.  मिशन मंगल सिनेमा तयार करतानाही जगन शक्ती यांनी इस्रोच्या अनेक शास्त्रज्ञांची मदत घेतली. शास्त्रज्ञांसह या चित्रपटाशी संबंधित रिसर्च टीमने अनेक तपशीलांवर काम केले होते.

मंगळ ग्रहावरील देशाच्या मोहीमेवर आधारित ‘मिशन मंगल’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजला होता. 

टॅग्स :अक्षय कुमारइस्रो