Join us

"नाव बदलून सीता ठेव...", सारानं घेतलं कामाख्या मंदिरात दर्शन अन् आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:48 IST

Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रवास केला आहे. तिने गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan)ने पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रवास केला आहे. तिने गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. साराने तिच्या गुवाहाटी ट्रिपचे अनेक फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. मंदिराला भेट दिल्यानंतर तिने ब्रह्मपुत्रा नदीवरील रिव्हर क्रूझचाही आनंद लुटला. यावेळी साराने पांढरा कुर्ता, पायजमा आणि दुपट्टा परिधान केला होता. मात्र, यावेळी तिला प्रचंड टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. सारा मंदिरात गेल्यामुळे अनेक लोक नाराज झाले आहेत.

सारा अली खानने फोटो शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या फोटोमध्ये ती बोटीवर बसून कॅमेऱ्यासाठी पोज देत होती. दुसऱ्या फोटोत ती ध्यान करताना दिसली. एका फोटोमध्ये ती अर्धा चेहरा लपवताना दिसली. शेवटच्या फोटोत सारा मंदिरात आशीर्वाद घेत असल्याचे दिसून आले. आणखी एका माणसानेही साराच्या शेजारी प्रार्थना केली. दोघांचीही पाठ कॅमेराकडे होती.

सारा अली खानची गुवाहाटीला भेटफोटोंसोबत साराने एक कविता देखील शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्यांना एक गोष्ट सांगितली आहे. तिने लिहिले, 'सतत प्रवाहात शांततेचे क्षण. श्वासोच्छ्वास आणि हळू चालण्याचं उद्देश पूर्ण केले. नदीची कुजबुज ऐका, सूर्याची चमक अनुभवा. खोलवर फिरा, जीवनाला स्वीकारा आणि स्वतःला विकसित करा. साराने ब्रह्मपुत्रा नदी, गुवाहाटी असे स्थान टॅग केले.

साराला केलं ट्रोल यावर्षी फेब्रुवारीमध्ये सारा अली खान झारखंडमधील देवघर येथील बैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात गेली होती. इंस्टाग्रामवर तिच्या ट्रिपचे फोटो शेअर करताना साराने लिहिले होते, 'जय बाबा बैद्यनाथ.' सारा अनेकदा धार्मिक स्थळांना भेट देताना दिसते आणि सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी आणि फॉलोअर्ससाठी फोटो शेअर करते. पण काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एकाने तर 'तुझे नाव बदलून सीता ठेव' असे सांगितले. तर दुसऱ्या युजरने तर तिला नावासोबत धर्म बदलण्याचा सल्ला दिला. आणखी एकाने म्हटले की, तू मुस्लीम आहेस. तर तू हे करू नकोस.

वर्कफ्रंटसारा अली खान अलीकडेच संदीप केलवानी आणि अभिषेक कपूर यांच्या 'स्काय फोर्स' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अक्षय कुमार आणि वीर पहारिया मुख्य भूमिकेत आहे. सारा 'मेट्रो देज डेज'मध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. अनुराग बसूच्या या अँथॉलॉजी चित्रपटात अली फजल, फातिमा सना शेख, अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी आणि कोंकणा सेन शर्मा यांच्याही भूमिका आहेत.

टॅग्स :सारा अली खान