बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी अभिनयासोबत तुमचा फिटनेसही महत्त्वाचा असतो. अशा इंडस्ट्रीत बऱ्याच अभिनेत्री आहे ज्यांचा वयाचा अंदाज लावणं कठीण जातं. आपल्या योगा, जिम यामुळे त्यांनी वयाच्या ५० व्या वर्षीही स्वत:ला फिट ठेवलं आहे. फोटोत दिसणारी ही अभिनेत्रीपण अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्याची फिटनेसची चर्चा कायम नेटकऱ्यांनामध्ये असते.
आम्हीवर दिलेल्या हिंटनंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते. वयाच्या १६ व्या वर्षी या चिमुकलीने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. दोन मुलांची आई असलेली ही अभिनेत्री आज १५० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे. शिल्पा आजकाल चित्रपटांनमध्ये कमी आणि छोट्या पडद्यावर जास्त सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. दोन मुलांची आई असूनही शिल्पा खूपच फिटनेस फ्रिक आहे. योगा करतानाचे आपले व्हिडीओ ती कायम सोशल मीडियावर शेअर करत असते. शिल्पा शेट्टी ही फिल्म इंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी स्वतःच्या बळावर यश मिळवलं आहे.
तिने आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरातीतून केली होती. चित्रपटसृष्टीत सेकेंड लीड अभिनेत्री म्हणून तिने एन्ट्री केली. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिल्पाचे खरे नाव हे अश्विनी असून शिल्पाने तिच्या आईच्या सांगण्यावरून तिचे नाव बदलले होते. शिल्पा शेट्टीने 1993 मध्ये 'बाजीगर' चित्रपटातून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं. पहिल्याच सिनेमात शिल्पाने आपल्या अभिनयाने मोठ्या अभिनेत्रींचं टेन्शन वाढवलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि चित्रपटाच्या यशानंतर शिल्पाने मागे वळून पाहिलेच नाही.