Join us

शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याची बदलली नेम प्लेट, सोशल मीडियावर होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 19:33 IST

Shah Rukh Khan House Mannat: शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याची नेम प्लेट नुकतीच बदलण्यात आली आहे. शाहरुख खानच्या बंगल्याच्या नवीन नेम प्लेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan)च्या मन्नत या बंगल्याची नेम प्लेट नुकतीच बदलण्यात आली आहे. शाहरुख खानच्या बंगल्याच्या नवीन नेम प्लेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. किंग खानच्या चाहत्यांनाही त्याच्या नेम प्लेटचा फोटो भावतो आहे. शाहरूखच्या घराची नेम प्लेट बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. मन्नतचे चार नेम प्लेट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शाहरूख खानचा बंगला मन्नतला नवीन स्टायलिश नेम प्लेट लावण्यात आली आहे आणि हा बदल किंग खानच्या चाहत्यांना खूप भावतो आहे. या नेम प्लेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की मन्नतच्या नावाची जुनी प्लेटच नेहमी आयकॉनिक राहील. तर काहींचे म्हणणे आहे की, नवीन स्टायलिश नेम प्लेट खूप खास आहे.

शाहरुखने नुकतेच त्याचा आगामी चित्रपट डंकीची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी करणार आहेत. पहिल्यांदाच हे दोघे एकत्र काम करणार आहेत.

शाहरूख खान ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो म्हणाला की, 'प्रिय राजकुमार हिराणी सर, तुम्ही तर माझे सॅंटा क्लॉज निघालात. तुम्ही सुरू करा, मी वेळेवर पोहचणार. इतकेच काय मी तर सेटवरच राहणार. फायनली तुमच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्साहित आहे. २२ डिसेंबर २०२३ ला तुमच्यासाठी घेऊन येत आहे 'डंकी'.

टॅग्स :शाहरुख खान