Join us

'मुलगी न्यासा आर्यनसोबत पळून गेली तर...'?करणच्या प्रश्नावर काजोलनेही दिलेले उत्तर वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 14:24 IST

करणने काजोलला असा काय प्रश्न विचारला ज्याचा विचार ना कधी काजोलने केला असेल ना शाहरुखने.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची आणि अभिनेत्री काजोल ही बॉलिवूड सिनेमांमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांचे सिनेमे नेहमीच सुपरहिट ठरले आहेत. ऑनस्क्रीन दोघांची जोडीने एकच धमाल उडवून दिली होती. दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.आजही दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यांच्याविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना प्रचंड रस असतो. शाहरुख- काजोल पाठोपाठ त्यांची मुलंही चर्चेत असतात. आर्यन आणि न्यासा दोघांवरही प्रचंड चर्चा रंगायच्या. सर्वाधिक चर्चा होणाऱ्या स्टारकिड्समध्ये आर्यन आणि न्यासा दोघेही गणले जातात.

काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नवीन नसून जुना आहे. कॉफी विथ करण शोमध्ये जेव्हा काजोलने उपस्थिती लावली होती, या शोमध्ये काजोलसह शाहरूख आणि राणी मुखर्जीही होते. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.व्हायरल होणारा व्हिडीओ जुना असला तरी काजोलने दिलेल्या उत्तरामुळे हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. 

करणने काजोलला असा काय प्रश्न विचारला ज्याचा विचार ना कधी काजोलने केला असेल ना शाहरुखनने. करणने विचारले, जर १० वर्षांनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि काजोलची मुलगी न्यासाला घेवून दोघे पळून गेले तर. तुमची प्रतिक्रिया काय असेल?तेव्हा काजोलने दिलेल्या उत्तरावच सा-यांच्या नजरा खिळतात. काजोलने स्मार्टली ''दिलवाले दूल्हा ले जाएंगे।'' असे उत्तर दिले होत. काजोलच्या या उत्तरामुळे शाहरुख मात्र जरा गोंधळला आणि तो म्हणालाृ मला विनोद समजत नाही. मला भीती वाटते की जर काजोल माझी नातेवाईक बनली तर....मी विचारही करू शकत नाही. शाहरुखचेही प्रतिक्रीया ऐकून काजोल आणि राणी दोघेही हसू लागतात. 

टॅग्स :आर्यन खानकाजोल