​धनूष शरिरावरील खुणा तपासा; मद्रास उच्च न्यायलयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 02:47 PM2017-02-28T14:47:04+5:302017-02-28T20:17:04+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा जावाई व अभिनेता धनुषच्या पालकत्वाच्या वादाने नवीन वळण घेतले आहे. धनुषच्या शरीरावरील खाणाखुणा तपासण्याचे आदेश मद्रास ...

Check the signs of the bow. Order of Madras High Court | ​धनूष शरिरावरील खुणा तपासा; मद्रास उच्च न्यायलयाचा आदेश

​धनूष शरिरावरील खुणा तपासा; मद्रास उच्च न्यायलयाचा आदेश

googlenewsNext
क्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा जावाई व अभिनेता धनुषच्या पालकत्वाच्या वादाने नवीन वळण घेतले आहे. धनुषच्या शरीरावरील खाणाखुणा तपासण्याचे आदेश मद्रास उच्चन्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमधील एका वयोवृद्ध जोडप्यानं आपणच धनुषचे खरे आई-वडील असल्याचा दावा केला होता. 

तामीळनाडूच्या थिरुप्पुवनम गावातील ६५ वर्षीय कथिरेसन आणि ५३ वर्षीय मीनाक्षी यांनी अभिनेता धनूष आपला मुलगा असल्याची दावा करणारी याचिका दाखल केली होती. एबीपी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, धनूषच्या गळ्याच्या उजव्या बाजुला एक तीळ आहे, तर उजव्या मनगटावर व्रण आहे, असा दावा दाम्पत्याने केला आहे. या दोन्ही जन्मखुणांविषयी शाळा हस्तांतरण दाखल्यात माहिती असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सरकारी डॉक्टरांकडून धनुषच्या शरीरावरील जन्मखुणांची तपासणी झाली. मदुराईतील राजाजी सरकारी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली.



अभिनेता धनुषने मात्र हे दावे फेटाळून लावले आहेत. धनुष हा रजनीकांत यांचा जावई आहे. धनुषने दंडाधिकारी न्यायालयातील याचिका रद्द करण्याची मागणी चेन्नई हायकोर्टात केली होती. कोर्टात तो आपल्या आईला घेऊन उपस्थित होता. याचिकाकर्त्या दाम्पत्याने आपल्यावर चुकीचा खटला चालविला असल्याचे धनूषने सांगितले होते. याचिकाकर्त्यांनी धनुष हा आपला तिसरा मुलगा आहे. आमच्या उदरनिवार्हासाठी त्याने आम्हाला महिन्याला 65 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी दाम्पत्याने आपल्या याचिकेत केली होती.

धनुष शाळेत असताना लहानपणीच घर सोडून पळाला होता. चेन्नईत जाऊन सिनेजगतात काम करण्यासाठी त्याने घर सोडलं होतं. आम्ही शोध घेऊनही तो सापडला नव्हता. मात्र सिनेमामध्ये दिसल्यानंतर आम्ही त्याला ओळखलं, असंही त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं.

Web Title: Check the signs of the bow. Order of Madras High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.