Chhaava Box Office Collection Day 14:विकी कौशल (vicky kaushal) स्टारर 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. 'छावा'चे (Chhaava) अनेक शो देखील हाऊसफुल्ल झाले आहेत. १४ फेब्रुवारीला 'छावा' जगभरात प्रदर्शित झाला. मात्र, २ आठवड्यानंतरही या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. रिलीजला दोन आठवडे उलटले असले तरी प्रेक्षकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. आता सिनेमाचं दोन आठवड्यांचं कलेक्शन समोर आलं आहे.
'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रदर्शनाआधीच सिनेमाचे शो सर्वत्र हाऊसफूल होते. याशिवाय छावा हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. छावाने आतापर्यंत अनेक नवे रेकॉर्डही आपल्या नावावर केले आहेत. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ५ लाख तिकीट विकले गेले होते. यातूनच १३.७० कोटी कमाई झाली होती. सिनेमाचं बजेट १३० कोटी आहे. २०२५ वर्षाची 'छावा'ने बॉलिवूडला दमदार सुरुवात करुन दिली आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'छावा' ने रिलीजच्या १४ व्या दिवशी १२ कोटींची कमाई केली आहे. यासह 'छावा'चे १४ दिवसांचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता ३९८.२५ कोटी रुपये इतकं झालं आहे. दरम्यान, ही आकडेवारी ही प्रारंभिक आहे, त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे.असं असूनही या चित्रपटाने 'स्त्री -२', 'दंगल', 'पठाण', 'गदर-२' आणि 'जवान' या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
'छावा' चित्रपटातविकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलं असून सिनेमात अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, डायना पेंटी यांचीही भूमिका आहे. मॅडॉक फिल्म्स बॅनरअंतर्गत दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे.