Chhaava Box Office Day 9: छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या 'छावा' या हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. 'छावा'च्या यशस्वी कामगिरीने बॉलिवूडची नव्या वर्षाची सुरुवात दमदार झाली आहे. संभाजी मराहाजांचं कार्य, त्यांचं शौर्य, त्यांचा त्याग पाहून प्रेक्षक रडताना दिसताय. याचे सर्व शोज सर्वत्र हाऊसफुल आहेत. लोक वेळात वेळ काढून महाराजांचा इतिहास पाहायला थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. याचे सर्व शोज सर्वत्र हाऊसफुल आहेत. लोक वेळात वेळ काढून महाराजांचा इतिहास पाहायला थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.
छावा सिनेमात विकी कौशलनेछत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई भोसलेंच्या भूमिकेत आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या संतोष जुवेकर, शुंभकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये ही मराठी कलाकारांची फौज आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम रचत आहे. सिनेमानं प्रदर्शनानंतर ९ दिवसांत संपूर्ण भारतात एकूण २९३.९१ कोटी रुपयांची कमाई केली असून कमाईचा (Chhaava Box Office Collection)आकडा सातत्याने वाढत आहे. रविवारी सिनेमा भारतात ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. वृत्त सॅकनिल्कनुसार, या सिनेमाने 'ओपनिंग डे'लाच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. विकीसाठी 'छावा' हा त्याच्या आजवरच्या सिनेमांपैकी सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. यापूर्वी त्याच्या 'उरी' सिनेमाने अशाप्रकारे दमदार कमाई केली होती.
'छावा'नं रिलीजच्या पहिल्याच दिवशी (शुक्रवार - १४ फेब्रुवारी) ३३.१ कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी - १५ फेब्रुवारी) सिनेमाने ३९.३ कोटींची कमाई केली. तर तिसरा दिवस रविवारी (१६ फेब्रुवारी) ४९.३ कोटींचा गल्ला सिनेमाने जमावला. चौथा दिवस सोमवारी (१७ फेब्रुवारी) २४.१ आणि पाचवा दिवस मंगळवारी (१८ फेब्रुवारी) २५.७५ कोटी कमावले. तर सहाव्या दिवशी म्हणजे शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) चित्रपटाने तब्बल ३२ कोटी रुपयांचे कलेक्शन केलं. तर सातव्या दिवशी (२० फेब्रुवारी) २३ कोटींची कमाई केली. तर आठव्या दिवशी (२१ फेब्रुवारी) २४ कोटींचा गल्ला जमवला. तर आता नवव्या दिवशी (२२ फेब्रुवारी) अर्थात दुसऱ्या शनिवारी ४४ कोटींची कमाई केली. असं या चित्रपटाचे ९ दिवसांचे कलेक्शन २९३.९१ कोटींपेक्षा अधिक झालं आहे.