Join us

Chhaava Movie: चोहीकडे विकी कौशलच्या 'छावा'चा बोलबाला, कमावले तब्बल 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 16:11 IST

'छावा' या चित्रपटानं अनेकांचे विक्रम मोडले आहेत.

Chhaava Box Office Collection:  विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची ( Chhaava Movie ) सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचे सगळीकडे कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे.. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई करत आहे. भारतात आणि परदेशातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.  या चित्रपटानं अनेकांचे विक्रम मोडले आहेत. 'छावा'समोर 'पुष्पा'ला झुकावं लागलं आहे. 

'छावा' चित्रपटानं 'पुष्पा २: द राईज'चा रेकॉर्ड मोडला आहे.  हिंदी बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या शुक्रवारच्या कमाईच्या बाबतीतही विकी कौशलच्या चित्रपटाने अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला मागे टाकलं आहे. हिंदी बॉक्स ऑफिसवर 'छावा'ने प्रदर्शनाच्या तिसऱ्या शुक्रवारी १३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला, तर 'पुष्पा २: द राईज'ने ११.३० कोटी रुपये (Chhaava Beats 'Pushpa 2' On The Third Friday) कमावले होते. दरम्यान जगभरातील कमाईच्या बाबतीत अद्याप 'पुष्पा २: द राईज' अग्रस्थानी आहे. या चित्रपटानं जगभरात १८०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 

'पुष्पा २: द राईज' अग्रस्थानी असला तरी 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या 'छावा'ने रविवारी दुपारपर्यंत ४४७.२६ कोटी कमावले आहेत. आता ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्यापासून फक्त एक इंच दूर आहे. सोमवारी हा चित्रपट ५०० कोटींचा चित्रपट बनेल अशी अपेक्षा आहे. यासोबतच 'छावा' हा २०२५ मधील हा पराक्रम करणारा पहिला चित्रपट ठरणार आहे.

मॅडॉक निर्मित ‘छावा’ चित्रपटात  छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल झळकला आहे. तर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसली आहे. तर, मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका बॉलिवूड स्टार अक्षय खन्नानं साकारली आहे.  'छावा' २०२५ चा सर्वात मोठा ओपनर ठरला. विकी कौशल व्यतिरिक्त दिव्या दत्त, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये असे बरेच कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. 

टॅग्स :विकी कौशलरश्मिका मंदानाअक्षय खन्ना