Join us

इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'छावा' फेम विकी कौशल, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:30 IST

Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याच्या 'छावा' (Chhaava Movie ) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे 'छावा' व्यतिरिक्त तो अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अशा परिस्थितीत, अभिनेता त्याच्या एका चित्रपटासाठी किती पैसे घेतो आणि त्याची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशलची एकूण संपत्ती अंदाजे ४१ कोटी रुपये आहे. अभिनेत्याची बहुतेक कमाई त्याच्या चित्रपटांमधून येते. याशिवाय, तो सोशल मीडियावर ब्रँड एंडोर्समेंट्स आणि प्रमोशनल पोस्टसह उत्कृष्ट काम करतो. विकी वर्षाला ८ कोटी रुपये कमावतो. त्यानुसार त्याचे मासिक उत्पन्न ६० लाख रुपये आहे. मात्र, आता त्याने त्याच्या चित्रपटांचे मानधन १५ ते २० कोटी रुपये केले आहे. या अभिनेत्याकडे मुंबईत आलिशान फ्लॅट आणि अनेक महागड्या गाड्या आहेत.

एका सिनेमासाठी किती घेतो मानधन?विकी कौशलचा पहिला सिनेमा २०११ साली आला होता, ज्याचे नाव लाल पेन्सिल होते. यात त्याची छोटी भूमिका होती. त्याने त्याच्या करिअरची सुरूवात अनुराग कश्यप दिग्दर्शत गँग्स ऑफ वासेपूरमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली होती. त्यानंतर त्याने लव शव ते चिकन खुराना आणि बॉम्बे वेलवेटसारख्या सिनेमाच्या प्रॉडक्शनमध्ये काम केले. अखेर विकीने २०१५ साली मसान चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्याने राजी, संजू, उरीःद सर्जिकल स्ट्राइक, सरकार उधम, जरा हटके जरा बचके, डंकी, सॅम बहादूर यासारख्या सिनेमात काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल त्याच्या एका सिनेमासाठी १५ ते २० कोटी रुपये मानधन घेतो. तर जाहिरातीतून तो २ ते ३ कोटी रुपये कमावतो. 

टॅग्स :विकी कौशलरश्मिका मंदाना'छावा' चित्रपट