Join us

Chhaava : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची यशस्वी घोडदौड, १२ दिवसांत मोडले अनेक सिनेमांचे रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:00 IST

'छावा' सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कामगिरी करायला सुरुवात केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आता १२ दिवस झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर 'छावा' सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे.

'छावा' सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा ज्वलंत इतिहास रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे. या सिनेमात विकी कौशले छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.'छावा' सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कामगिरी करायला सुरुवात केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आता १२ दिवस झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर 'छावा' सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. 

१४ फेब्रुवारीला 'छावा' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी सिनेमाने ३१ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर वीकेंडला सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या वीकेंडलाही 'छावा' सिनेमाने तब्बल ८४ कोटींची कमाई केली. आता १२ व्या दिवशी सिनेमाने अंदाजे १८ कोटींचा गल्ला जमवला आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने एकूण ३६३.३५ कोटींचं कलेक्शन केलं आहे. लवकरच हा सिनेमा ४०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल. 

'छावा' सिनेमात विकी कौशलसोबतरश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. रश्मिकाने सिनेमात महाराणी येसूबाई भोसलेंची भूमिका साकारली आहे. तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात मराठी कलाकारांचीही फौज आहे.  

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदाना