Join us

"मराठीमध्येही अनेक सिनेमे आले पण.."; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितली महत्वाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:54 IST

लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'च्या ट्रेलर लाँचच्या वेळेस मराठीमध्ये बनणाऱ्या ऐतिहासिक सिनेमांवर प्रकाश टाकला (chhaava)

'छावा' सिनेमाचा ट्रेलर लाँच २२ जानेवारीला पार पडला. यावेळी विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर उपस्थित होते. मराठमोळ्या थाटात आणि दमदार अंदाजात मुंबईत 'छावा'चा ट्रेलर लाँच झाला. यावेळी विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि सिनेमाच्या संपूर्ण कास्टने 'छावा' सिनेमाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर काय म्हणाले बघा.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी व्यक्त केल्या भावना

लक्ष्मण उतेकर यांनी ट्रेलर लाँचच्या वेळेस त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, "मराठीमध्येही संभाजी महाराजांवर अनेक सिनेमे आले आहेत. परंतु बजेटचा मोठा प्रश्न प्रादेशिक सिनेमांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे वैभव होतं, त्यांचं साम्राज्य होतं, त्यांंचं जे वलय होतं ते बजेटमुळे दाखवता येत नाही."

"छत्रपती शिवाजी महाराजांवर ऑक्सफोर्ड विद्यापीठात Ph.d केली आहे. त्यांच्यासारखा राजा होणे नाही. छत्रपती शिवरायांनी भारतात पहिल्यांदा नेव्हीचा शोध लावला. पण कुठेतरी बजेटमुळे प्रादेशिक सिनेमे हे दाखवू शकत नाहीत.  त्यामागे अनेक कारणं आहेत. मला आमचे निर्माते दिनू सरांमुळे ही गाथा बनवण्याची संधी मिळाली."

"माझी इच्छा होती की, छत्रपती संभाजी महाराज कोण होते हे फक्त हिंदुस्थानात नाही तर जगातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कळले पाहिजेत की, हा राजा कोण होता?  त्यामुळे बजेटचा प्रश्न हा येतोच. कारण रायगडाचा भव्यदिव्य किल्ला, स्वराज्याचा तो वैभवशाली काळ दाखवण्यासाठी पैशांवर सर्व गणित अडून बसतं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचं वैभव काय होतं, त्यांचं मराठा साम्राज्य किती भव्य आणि किती थोर होतं हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय." अशा शब्दात लक्ष्मण यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात.

टॅग्स :विकी कौशलरश्मिका मंदानाअक्षय खन्नाछत्रपती संभाजी महाराज