Join us

"शिवाजी नही छत्रपती शिवाजी"; औरंगला ठणकावून सांगणारा तो 'बाल संभाजी' कोण? 'छावा'मधून वेधलं लक्ष

By ऋचा वझे | Updated: February 20, 2025 14:15 IST

'छावा' सिनेमात एका बालकलाकारानेही काही मिनिटांच्या सीनमधून लक्ष वेधून घेतलंय.

'छावा' (Chhaava) सिनेमातून सध्या जगभरातील थिएटर दणाणून सोडले आहेत. पहिल्या पाच दिवसातच सिनेमाने २०० कोटींची कमाई केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलचं (Vicky Kaushal) भरभरुन कौतुक होतंय. तसंच इतर कलाकारांनीही उत्तम भूमिका साकारल्या आहेत. सिनेमात औरंगच्या नजरेला नजर देऊन बोलणारा 'बाल संभाजी'ही काही मिनिटांसाठ दिसतो. तो चिमुकला नक्की कोण माहितीये का?

'छावा' सिनेमात एका बालकलाकारानेही काही मिनिटांच्या सीनमधून लक्ष वेधून घेतलंय. ८ वर्षांच्या बाल संभाजीची त्याने भूमिका साकारली आहे. औरंगच्या दरबारात त्याच्यासमोर उभा राहून थेट त्याच्या नजरेला नजर भिडवणाऱ्या या चिमुकल्याचं नाव आहे अभिनव साळुंखे (Abhinav Salunkhe). या मराठमोळ्या बालकलाकारानेही काही मिनिटांच्या सीनमध्ये उत्तम काम केलं आहे. 'शिवाजी नही आया?' असं औरंग त्याला विचारतो तेव्हा हा चिमुकला एन्ट्री घेत म्हणतो, 'छत्रपती शिवाजी महाराज'. 'आपको बुखार नही आता?' असं औरंग त्याला गंमतीत विचारतो तेव्हा बाल संभाजी म्हणतो, 'हमारी वजह सै औरोको बुखार आता है'. बाल संभाजी आणि औरंगचा हा काही मिनिटांचा सीनही मनाला भिडणारा आहे. छत्रपती संभाजी महाराज लहानपणापासूनच निडर होते हे यातून दाखवलं आहे. 

अभिनव साळुंखे हा मुंबईचाच आहे. 'छावा'मधल्या त्याच्या कामाचंही खूप कौतुक होत आहे. औरंगसमोर डायलॉग बोलताना त्याच्याही डोळ्यात स्वराज्याची धगधगती आग स्पष्ट दिसून येते. शंभूराजांच्या भूमिकेत तो अगदी शोभून दिसला आहे. अभिनवचा विकी कौशलसोबत फोटोही आहे जो आता व्हायरल होतोय.

'छावा' १४ फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. विकी कौशल, रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता सह अनेक कलाकार सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :'छावा' चित्रपटअक्षय खन्नासेलिब्रिटीबॉलिवूडविकी कौशल