अभिनेता विकी कौशलची (vicky kaushal) प्रमुख भूमिका असलेला 'छावा' (chhaava) सिनेमा केवळ भारतात नाही तर जगभरात गाजला. 'छावा' सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं. 'छावा' सिनेमातील सर्वच भूमिका गाजल्या. यापैकीच एक भूमिका म्हणजे कवी कलशची भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंग. (vineet kumar singh) 'छावा' सिनेमात छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांची घनिष्ट मैत्री बघायला मिळाली. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत या दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. अशातच ऑफ स्क्रीनही विकी आणि विनितची खास मैत्री बघायला मिळतेय. 'छावा'च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरलछत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मांडणाऱ्या 'छावा'च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत अंगाला माती फासून सर्व मावळे गनिमांवर चाल करतात. ही अनोखी लढाई सिनेमात आपण पाहिली. या लढाईच्या सीनचं शूटिंग झाल्यावर विकी आणि विनीतने एकमेकांना केक भरवून मिठी मारली. विकी आणि विनीत यावेळी भावुक झालेले दिसले. एकूणच ऑन स्क्रीन कवी कलश आणि शंभूराजेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांची घनिष्ट मैत्री ऑफस्क्रीनही पाहायला मिळाली.
Video: एकमेकांना मिठी मारुन झाले भावुक! विकी आणि विनीत कुमार सिंग यांचा 'छावा'च्या सेटवरील व्हिडीओ
By देवेंद्र जाधव | Updated: March 12, 2025 12:02 IST