'स्वदेस' सिनेमा सर्वांना माहित असेलच. शाहरुख खानची प्रमुख भूमिका आणि आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन असलेला 'स्वदेस' सिनेमा आजही एक क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. या सिनेमाचा विषय, आशय, गाणी, अभिनय अशा सर्व गोष्टींची आजही तितकीच चर्चा होते. 'स्वदेस' सिनेमात शाहरुखसोबत चिकूच्या भूमिकेत एक बालकलाकार झळकलेला. हा बालकलाकार आता मोठा झाला असून त्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन बघून थक्क व्हाल.
'स्वदेस'मधील बालकलाकाराचं ट्रान्सफॉर्मेशन
'स्वदेस'मधील बालकलाकाराचं नाव आहे स्मित सेठ. स्मित आता मोठा झाला असून त्याने अभिनय क्षेत्रात नव्हे तर स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केलंय. स्मितला अभिनय क्षेत्र खूप बेभरवशाचं वाटत असल्याने त्याने लहानपणापासूनच शिक्षणावर केंद्रित केलं. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता स्मितने शिक्षण घेण्यावर फोकस केला. स्मितने लहानपणी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख मिळवली आहे.
स्मितने सध्या काय करतो?
स्मितने बालकलाकार म्हणून 'बागबान' सिनेमात सलमान खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती. याशिवाय 'आँखे', 'खेले हम जी जान से' या सिनेमांमध्ये स्मितने काम केलं. स्मितने 'बा, बहू और बेबी' यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही काम कल केलंय. स्मितने सीए नंतर सीएसची परीक्षा दिली. नंतर स्मितने लॉचं शिक्षण घेतलं. सध्या स्मित एका मल्टिनॅशनल कंपनीत ऑडिटरचं काम करतो. स्मित फायनान्शिअल एक्सपर्ट झाला आहे. अशाप्रकारे अभिनय क्षेत्र सोडून स्मितने करिअरची वेगळी तरीही यशस्वी वाट निवडली.