Join us

Children's Day Special : बॉलिवूडमधील हा अभिनेता नुकताच बनला आहे बाबा, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 05:30 IST

झेन आणि मीशाप्रमाणेच शाहिद देखील त्याच्या लहानपणी खूपच गोड दिसायचा. त्याने त्याचा एक लहानपणीचा फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

ठळक मुद्देशाहिदने त्याचा एक क्यूट लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता.या फोटोत तो त्याचा भाऊ इशानला मांडीवर घेऊन बसला आहे. शाहिदप्रमाणेच त्याचा भाऊ इशान खट्टर देखील चित्रपटांमध्ये काम करत असून त्याचा धडक हा चित्रपट आणि या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

शाहीद कपूरला काही महिन्यांपूर्वी मुलगा झाला असून त्याने त्याचे नाव झेन असे ठेवले होते. शाहिदचा झेन कसा दिसतो याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फॅन्सना लागली होती. त्याच्या फॅन्ससाठी त्याची पत्नी मीरा रजपूतने नुकताच झेनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून हा फोटो शाहिदच्या फॅन्सना खूपच आवडत आहे. सोबत एक कॅप्शन लिहिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हेलो वर्ल्ड... 

मीराने शेअर केलेल्या या फोटोत झेनने मरून रंगाचे कपडे घातले असून त्यात तो खूपच छान दिसत आहे. या फोटोला केवळ एका तासात दीड लाखाहूून अधिक लाइक्स मिळाले आहेत. शाहिदचा भाऊ इशान खत्तरनेच या फोटोवर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट केले आहे. त्याने जान बच्चा असे त्याच्या पुतण्याच्या फोटोवर कमेंट केले आहे. झेनचा हा फोटो सोशल मीडियावर सगळ्यांनाच आवडत आहे हे फोटोला मिळत असलेल्या लाइक्स आणि कमेंट्सवरून कळत आहे. झेन खूपच गोड असल्याचे शाहिदचे फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. तसेच झेन हा शाहिदचीच दुसरी कॉपी असल्याचे देखील काहींनी म्हटले आहे. झेनच्या प्रेमात शाहिदचे फॅन्स पडले आहेत. 

पण तुम्हाला माहितेय का शाहिद देखील त्याच्या लहानपणी खूपच गोड दिसायचा. शाहिद आणि मीरा यांना झेनच्या आधी मिशा ही मुलगी आहे. मिशाच्या वेळी मीरा गर्भवती असल्याचे कळले, त्यावेळी तर शाहिद प्रचंड खूश झाला होता. त्याने ही बातमी स्वतःहून मीडियाला दिली होती आणि ही बातमी देताना त्याने त्याचा एक क्यूट लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. या फोटोवरून तो किती सुंदर होता हे लगेचच कळून येत आहे. या फोटोत तो त्याचा भाऊ इशानला मांडीवर घेऊन बसला आहे. शाहिदप्रमाणेच त्याचा भाऊ इशान खट्टर देखील चित्रपटांमध्ये काम करत असून त्याचा धडक हा चित्रपट आणि या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. 

 

टॅग्स :शाहिद कपूरबालदिन