Join us  

सर, सॅल्युट आपल्याला...! ‘द कश्मीर फाईल्स’मधील चिन्मय मांडलेकरच्या अभिनयावर प्रेक्षक फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 4:54 PM

Chinmay Mandlekar In The Kashmir Files: ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकरनं साकारलेल्या बिट्टाची भूमिका अंगावर काटा आणते. चित्रपट पाहताना या व्यक्तिरेखेचा राग येऊ लागतो. यातच चिन्मयचं यश म्हणावं लागेल, अशा शब्दांत त्याचं कौतुक होतंय.

 Chinmay Mandlekar In The Kashmir Files:विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडणाऱ्या या सिनेमाचं सर्वस्तरातून कौतुक होतंय. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. अगदी 400 कोटींच्या ‘राधेश्याम’ सारख्या चित्रपटावर ‘द कश्मीर फाईल्स’ भारी पडला आहे. याचं एक प्रमुख कारण आहे, या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय.

अनुपम खेर यांनी या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे.  चिन्मय मांडलेकर ( Chinmay Mandlekar ), पल्लवी जोशी या मराठी कलाकारांचा अभिनयही त्यांच्याइतकाच दमदार आहे. विशेषत: चिन्मय मांडलेकरनेसिनेमात साकारलेली बिट्टाची भूमिका अप्रतिम आहे. सोशल मीडियावर त्याच्या या भूमिकेचं जबरदस्त कौतुक होतंय. त्यानं साकारलेल्या बिट्टा कराटेची भूमिका अंगावर काटा आणते. चित्रपट पाहताना या व्यक्तिरेखेचा राग येऊ लागतो. यातच चिन्मयचं यश म्हणावं लागेल, अशा शब्दांत त्याचं कौतुक होतंय.

चाहते म्हणाले, जबरदस्त...चिन्मय मांडलेकरने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर चित्रपटातील एका दृश्याचा फोटो शेअर केला. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. ‘आज चित्रपट पाहताना चिन्मय सर खूप कौतुक वाटलं तुमचं. गेल्या आठवड्यात पावनखिंड पाहताना शिवाजी महाराजांच्या डोळ्यांतील करारीपणा, भावूक, करूणा भाव नि आज कश्मीर फाईल्समधल्या बिट्टाच्या डोळ्यातील क्रौर्य,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. ‘काय बोलावं तुमच्याविषयी... छत्रपती शिवाजी महाराज ते आता हा निगेटीव्ह रोल. सर, सॅल्युट आपल्याला,’अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे.

‘चिन्मय मांडलेकर यांची कश्मीर फाईल्समधील भूमिका पाहून अक्षरश: संताप येतो. हेच त्याचे कलाकार म्हणून यश आहे,’अशा शब्दांत एका चाहत्याने चिन्मयच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

‘मागच्या आठवड्यात पावनखिंड बघितला  आणि तुमची महाराजांची प्रतिमा मनात बसली. अभिमान, आदर सर्वकाही वाटायला लागलं. आणि आज काश्मीर फाईल्स बघितला... तर आज तुमच्या बद्दल राग, किळस , तिरस्कार सर्वकाही मनात आलं. एका कामानंतर दुसरं काम बघितल्यावर लगेच प्रेक्षकाच्या मनातील तुमच्या विषयीचे भाव जर बदलतात, माझ्या मते, यालाच अभिनय म्हणतात. खूप छान सर,’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

टॅग्स :चिन्मय मांडलेकरबॉलिवूडसिनेमाअनुपम खेर