Join us

चिराग पाटीलचा '८३'मधला लूक पाहिलात का ? ही आहे लूकची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 13:45 IST

83 Movie : १९८३ विश्वचषक स्पर्धेवर आधारित '८३' या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे.

'वजनदार' या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा हॅण्डसम अभिनेता चिराग पाटील आता बॉलिवूडच्या पीचवर षटकार ठोकायला सज्ज झाला आहे. १९८३ विश्वचषक स्पर्धेवर आधारित '८३' या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमातील चिरागचा लूक सोशल मीडियावर आऊट झाला आहे. पोस्टरमध्ये चिराग हातात बॅट धरुन उभा आहे.विशेष म्हणजे यात सिनेमात तो त्याच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.   

'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. यात कपिल देव यांची  भूमिका रणबीर सिंग साकारत आहे.या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे. आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवी शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैय्यद किरमणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. '८३' हा सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

आपल्या अभिनयाने चिरागने रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे.  'राडा रॉक्स', 'असेही एकदा व्हावे' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय 'चार्जशीट', 'ले गया सद्दाम' अशा हिंदी चित्रपटातही त्याच्या अभिनयाची जादू दिसली आहे. प्रेक्षकांना चिरागला वडील संदीप पाटील यांच्या भूमिकेत पाहणं रंजक ठरणार आहे.

टॅग्स :चिराग पाटील८३ सिनेमा