नवाजसोबत बोल्ड सीन देण्यास चित्रांगदाचा नकार??
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2016 2:17 PM
चित्रांगदा सिंह गेल्या पाच वर्षांपासून कुठल्याही चित्रपटात दिसलेली नाही. पाच वर्षांपूर्वी ‘देसी बॉय्ज’मध्ये ती अखेरची दिसली होती. गेल्यावर्षी ‘गब्बर ...
चित्रांगदा सिंह गेल्या पाच वर्षांपासून कुठल्याही चित्रपटात दिसलेली नाही. पाच वर्षांपूर्वी ‘देसी बॉय्ज’मध्ये ती अखेरची दिसली होती. गेल्यावर्षी ‘गब्बर इज बॅक’मध्ये ती केवळ एक आयटम साँग करताना दिसली. अशातच ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटातून चित्रांगदा कमबॅक करणार, अशी खबर आली. या बातमीने चित्रांगदाचे चाहते खूश झालेत. गत आठवड्यात शूटींगही सुरु झाली...पण शूटींगनंतर तीनच दिवसांत चित्रांगदाने हा चित्रपट सोडला. दिग्दर्शक कुषाण नंदी व निर्मात किरण श्रॉफसोबत चित्रांगदाचे इतके वाजले की, चित्रांगदाने बॅग पॅक केली आणि ती तडक लखनौवरून मुंबईला परतली. ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ मध्ये नवाजुद्दीन मुख्य भूमिकेत आहे. ही एका कॉन्ट्रेक्ट किलरची कथा आहे. यात चित्रांगदा गावातील एक गरिब तरूणी बनणार होती. ती या कॉन्ट्रेक्ट किलरवर भाळते आणि त्यांचे प्रेम बहरते, असे एक वळणही चित्रपटात होते. या वळणावर नवाजुद्दीन व चित्रांगदा यांच्या काही बोल्ड सीन द्यायचे होते. इथूनच वाद सुरू झाला म्हणे...या सीनमध्ये चित्रांगदा पेटीकोट व ब्लाऊजवर होती. हा सीन शूट झाला. पण डायरेक्टरला तो आवडला नाही. या सीनमध्ये चित्रांगदाने नवाजवर हावी व्हावे, असे डायरेक्टरने सुचवले. पण अशाने सीन आणखी बोल्ड झाला असता त्यामुळे चित्रांगदाने यास नकार दिला आणि वाद वाढला. काही किसींग सीन पुन्हा देण्यासही तिने नकार दिला. निर्माता किरण श्रॉफ सेटवर राहून शूटींगमध्ये ढवळाढवळ करते, ही बाबही चित्रांगदाला रूचली नाही म्हणे...आता खरे काय, ते चित्रांगदाच जाणे..