Join us

​चित्रांगदा सिंहला ‘ब्रेक’ पडला महाग! आता संजय दत्तसोबत करणार ‘वापसी’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 4:41 AM

‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिने इंडस्ट्रीतून एक मोठा ब्रेक घेतला. साहजिकचं या ...

‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिने इंडस्ट्रीतून एक मोठा ब्रेक घेतला. साहजिकचं या ब्रेकमुळे चित्रांगदाच्या करिअरचा ग्राफ एकदम खाली आला. हा ब्रेक मला खूप महाग पडला, असे खुद्द चित्रांगदानेही अलीकडे मान्य केले.  मी बॉलिवूडमध्ये आले आणि अचानक आयुष्यात वेगवेगळी वळणे आलीत. या वळणांवर माझ्या आयुष्याचा प्राधान्यक्रम बदलला. मी चित्रपटांपासून चार वर्षांचा ब्रेक घेतला. यानंतर मी पुन्हा परत आले आणि यानंतर आणखी दोन वर्षांच्या ब्रेकवर गेले. यामुळे माझ्या करिअरचे बरेच नुकसान झाले,असे चित्रांगदा अलीकडे म्हणाली. पण आता हे नुकसान जमेल तसे भरून काढण्याचा निर्णय चित्रांगदाने घेतला आहे. होय, ‘साहब, बीवी और गँगस्टर3’ या चित्रपटाद्वारे चित्रांगदा मोठ्या पडद्यावर वापसी करतेय.अलीकडे या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो लीक झाला. या फोटोत ती संजय दत्तसोबत दिसून आली. ‘बाजार’ या अन्य एका चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटांशिवाय ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या रिअ‍ॅलिटी शोच्या चौथ्या सीझनमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेतही दिसणार आहे.बॉलिवूडमध्ये अनेक आॅफर्स मिळत असताना तुम्ही त्या स्वीकारण्याच्या स्थितीत नसाल तर निश्चितपणे तुमच्या करिअरवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणारच. चित्रांगदाही या स्थितीतून गेली. आता या स्थितीतून चित्रांगदा किती लवकर बाहेर पडते, ते बघूच.ALSO READ : ​‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’द्वारे चित्रांगदा सिंह करणार टेलिव्हीजनवर पदार्पणचित्रांगदाने ‘सॉरी भाई’,‘देसी बॉयज’,‘ये साली जिंदगी’,‘गब्बर इज बॅक’ आदी चित्रपटांत काम केले आहे. चित्रांगदा सिंह गत सहा- सात वर्षांपासून कुठल्याही चित्रपटात दिसलेली नाही. २०११ मध्ये ‘देसी बॉय्ज’मध्ये ती अखेरची दिसली होती. त्यानंतर ‘गब्बर इज बॅक’मध्ये  एक आयटम साँग करताना ती दिसली. यादरम्यान ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या  चित्रपटातून चित्रांगदा कमबॅक करणार, अशी खबर आली होती. पण  निर्मात्यासोबत मतभेद निर्माण झाल्याने चित्रांगदाने ऐनवेळी या चित्रपटातून आपले अंग काढून घेतले होते.