गीतांजली आंब्रे
इलियाना डीक्रूजने 2006 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली. 2012 मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. रूस्तम, मैं तेरा हिरो, मुबारका अशा अनेक सिनेमांमध्ये ती दिसली आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'रेड' सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारली होती. नुकतीच इलियाना फिजी आयलँडची ब्राँड अॅम्बेसिडर झाली आहे त्यानिमित्ताने त्याच्याशी साधलेला हा संवाद.
तुला फिजीचे कोणती गोष्ट जास्त भावली ?मी फिजीच्या प्रत्येक गोष्टीच्या प्रेमात पडले आहे. तिथली संस्कृती, लोक, खाद्य संस्कृती आणि फिजीमधली निसर्ग रम्य ठिकाणं मला सगळं काही भावलं. मी तिथली ब्राँड अॅम्बेसिडर झाली म्हणून हे सर्व काही बोलतं नाहीय तर मला तिथली प्रत्येक गोष्ट मनापासून आवडले. 'फिजी'च्या संस्कृतीवर भारतीय संस्कृतीचा खूप जास्त प्रभाव आहे. फिजीमध्ये मला माझं सकेंड होम मिळल्याय असेच मी म्हणेन तसेच मला आयलँडदेखील खूप आवडतात.
'रेड'नंतर तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगशील ?मी रेडनंतर बॉलिवूडचा सध्या एक ही सिनेमा साईन केलेला नाही. पण हा मी जवळपास सहा वर्षानंतर साऊथच्या सिनेमात दिसणार आहे. बऱ्याच वर्षानंतर मी साऊथमध्ये काम करत असल्याने या प्रोजेक्टला घेऊन खूपच उत्सुक आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये माझा हा सिनेमा रिलीज होईल.
तू एखादी भूमिका निवडताना कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य देतेस ?सिनेमाची कथा आणि माझी त्यातील भूमिका दोनही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कथा कित्ती दर्जेदार आहे आणि माझ्या वाटेला आलेल्या भूमिकेत मी फिट बसतेय का? या सर्व गोष्टींचा विचार करुनच मी भूमिका स्वीकारते. तुला बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे का ?तसा मी कधी अजून विचार केलेला नाही. मी आतापर्यंत केलेली प्रत्येक भूमिका मला माझ्या नशीबाने मिळाली. त्यामुळे असे ठरवून कधी काही केले नाही. जे आले ते स्वीकारत गेले आणि कोणत्याही व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम करणं मला शिवधनुष्य पेलण्यासारखे वाटते. त्यामुळे कोणताही बायोपिक स्वीकारायची आधी मी विचारपूर्वक स्वीकारने.