Join us

गुडन्यूज! 'या' तारखेला पुन्हा साजरा होणार 'सिनेमा लव्हर डे', कोणताही चित्रपट फक्त ९९ रुपयात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 2:35 PM

सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! या तारखेला पुन्हा सिनेमा लव्हर डे साजरा होत असून कोणत्याही सिनेमाचं तिकिट ९९ रुपयात उपलब्ध आहे.

थिएटरमध्ये सिनेमे पाहण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. वीकेंडला सहकुटुंब सिनेमा पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. कधीकधी सिनेमागृहांचं तिकीट अनेकांना परवडत नाही. त्यामुळे इच्छा असूनही काहींना घरीच सिनेमे पाहावे लागतात. पण अशा लोकांसाठी आम्ही एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांच्या आवडीचा सिनेमा लव्हर डे येत असून कोणताही सिनेमा प्रेक्षकांना ९९ रुपयात बघण्याची संधी मिळणार आहे.

या तारखेला पुन्हा एकदा सिनेमा लव्हर डे

देशभरातील मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) २०२४ मधील 'सिनेमा लव्हर डे'ची घोषणा केलीय. या शुक्रवारी म्हणजेच २० सप्टेंबरला 'सिनेमा लव्हर डे' असून प्रेक्षकांना कोणताही सिनेमा ९९ रुपयात बघण्याची संधी मिळणार आहे. देशभरातील ४००० सिनेमागृहांमध्ये २० सप्टेंबरला ९९ रुपयात सिनेमा पाहण्याची ऑफर लागू आहे. केवळ 3D, रिक्लायनर सिनेमा स्क्रीन्समध्ये ही ऑफर लागू नाहीय. त्यामुळे या शुक्रवारी २० सप्टेंबरला प्रेक्षकांना ९९ रुपयात कोणताही सिनेमा पाहता येणार आहे.

या सिनेमांना होणार फायदा

'सिनेमा लव्हर डे' मुळे अनेक सिनेमांना फायदा होणार आहे. मराठी सिनेसृष्टीत 'नवरा माझा नवसाचा २' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा २० सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 'नवरा माझा नवसाचा २' ला रिलीजच्या पहिल्याच दिवशी केवळ ९९ रुपये तिकिटामुळे हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आहे. हिंदीमध्ये सिद्धांत चतुर्वेदी - राघव जुएलचा 'युध्रा' सिनेमा रिलीज होतोय. याशिवाय काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'तुंबाड', 'द बकिंगहम मर्डर' या सिनेमांनाही या ऑफरचा फायदा होईल हे निश्चित.

टॅग्स :तुंबाडसिनेमामराठीबॉलिवूड