Join us

पुन्हा येतोय Cinema Lover's Days! या तारखेला कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:46 IST

नॅशनल सिनेमा लव्हर डे पुन्हा साजरा होणार असून तुम्ही कोणताही सिनेमा फक्त ९९ रुपयांत बघू शकता

तर सिनेप्रेमी माणसांनो! थिएटरमध्ये नवीन सिनेमा लागल्यावर तो सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याची सर्वांना उत्सुकता असते. कधी तिकीट जास्त असल्यामुळे लोक थिएटरमध्ये इतके जात नाहीत. घरबसल्या ओटीटीवर सिनेमाचा आनंद घेण्यासाठी असे लोक प्राधान्य देतात. अशाच सिनेप्रेमी लोकांसाठी 'नॅशनल सिनेमा लव्हर डे' पुन्हा आलाय. या दिवशी तुम्ही कोणत्याही थिएटरमध्ये कोणताही सिनेमा फक्त ९९ रुपयांत बघू शकता. जाणून घ्या याबद्दल

या तारखेला साजरा होतोय नॅशनल सिनेमा लव्हर डे

तर सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो 'नॅशनल सिनेमा लव्हर डे'चा दिवस अखेर आलाय. उद्या अर्थात २९ नोव्हेंबरला 'नॅशनल सिनेमा लव्हर डे' साजरा होतोय.  यादिवशी तुम्ही तुमच्या नजीकच्या कोणत्याही थिएटरमध्ये फक्त ९९ रुपयांत सिनेमाचा आनंद घेऊ शकता. यामुळे काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम सिनेमांना नक्कीच फायदा होईल.

या सिनेमांना होणार फायदा

नॅशनल सिनेमा लव्हर डे निमित्ताने हिंदीमधील I want to talk, मराठीमधील 'पाणीपुरी', 'धर्मरक्षक छत्रपती संभाजी' याशिवाय कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजलेल्या All we imagine as light या सिनेमांना नक्कीच फायदा होईल. तिकिट फक्त ९९ रुपये असल्याने महागड्या तिकिटांमुळे थिएटरमध्ये जाण्यास स्वतःला रोखणारे सिनेप्रेमी 'नॅशनल सिनेमा लव्हर डे' निमित्त थिएटर्स हाऊसफुल्ल करतील यात शंका नाही.

टॅग्स :बॉलिवूडमराठी चित्रपट