Join us

सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनमुळे अली फजलवर सांडली कॉफी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:55 IST

अली फजलवर कॉफी सांडल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काय घडलं नेमकं?

अली फजल हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. अलीने '3 इडियट्स', 'फुकरे', 'तडका', 'प्रस्थानम' अशा सिनेमांमधून लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. अलीने काही महिन्यांपुर्वी रिचा चढासोबत लग्न केलं. याशिवाय काहीच दिवसांपुर्वी दोघांनी ते आई - बाबा होण्याची गुड न्यूज सर्वांना दिली. अली सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. अशातच अलीचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यावर एका फॅनमुळे अलीच्या शर्टवर कॉफी सांडल्याची गोष्ट घडली.

अली फजल एका कपड्यांच्या दुकानातून बाहेर आलेला दिसला. तो समोर असलेल्या पापाराझींसोबत फोटोशूट करताना दिसला. अशातच एक फॅन गडबडीत अलीजवळ सेल्फी घेण्यासाठी आला. अलीच्या हातात कॉफी होती. फॅनने सेल्फी घेताना गडबडीत अलीला धक्का दिला. त्यामुळे अलीचा तोल जाऊन त्याच्या शर्टवर कॉफी सांडली. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

अनेकांनी हा व्हिडीओ पाहून अली एका ब्रँडचं मार्केटिंग करत असून, त्यासाठी त्याने ही कृती केली असं म्हणत आहेत. अनेकांनी अली ज्या कपड्यांच्या दुकानातून बाहेर पडला त्या 'रेमंड'चं प्रमोशन करत असल्याची चर्चा केली. अली किंवा त्याच्या टिमने याविषयी कोणताही अधिकृत खुलासा केला नाही. अलीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. तो लवकरच अनुराग बासूंच्या 'मेट्रो इन डिनो' सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :अली फजलरिचा चड्डा