Join us

​कॉलेजचे विद्यार्थी, राजकारण आणि चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2016 8:04 AM

दिल्लीचे जेएनयू कॉलेज यावेळी संपूर्ण देशातच नव्हे, तर जगात वाद-विवाद आणि चर्चेचे केंद्र बनलेले आहे. देशद्रोहाच्या आरोपात जेएनयूचे विद्यार्थी ...

दिल्लीचे जेएनयू कॉलेज यावेळी संपूर्ण देशातच नव्हे, तर जगात वाद-विवाद आणि चर्चेचे केंद्र बनलेले आहे. देशद्रोहाच्या आरोपात जेएनयूचे विद्यार्थी संघटनाचे अध्यक्ष यांच्या अटकेच्या बातम्या मीडियामध्ये चर्चेचा विषय झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाला अनुसरून बॉलिवूडदेखील वेगवेगळ्या हिस्स्यात वाटलेला दिसत आहे. जेएनयूच्या आताच्या वादामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे राजकारण पून्हा एकदा वादाचा मुद्दा झाले आहे. बॉलिवूड मध्येदेखील विद्यार्थ्यांच्या राजकारणावरून अनेक चित्रपट बनलेले आहेत, ज्यात कॉलेज मध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणूकीत राजकीय पक्षांचे हस्तक्षेप आणि सक्रियेतेवरून गुंडागर्दी आणि नेतागिरी पर्यंतचे अनेक किस्से समोर आणले आहेत. कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या राजकारणावरून बनलेला पहिला चित्रपट जो चर्चेत होता, तो होता गुलजार यांचा ‘मेरे अपने’, ज्यात विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हाने कॉलेज मध्ये शिकणाºया अशा  विद्यार्थ्यांची भूमिका साकारली होती, जे नेहमी समोरा समोर राहतात मात्र हिंसेत त्यांना काही आवड नसते.या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हाचा डायलॉग- ‘श्याम (विनोद खन्ना) आए, तो उससे कह देना कि छेनू (शत्रुघ्न सिन्हा)आया था’ हा आजपर्यंत हिट मानला जात आहे. या चित्रपटात विद्यार्थी राजकारणाचे अनेक पैलूंना गांभिर्याने दाखविण्यात आले होते. या चित्रपटाच्या काही वर्षानंतर हैदराबादहून आलेले युवा निर्देशक रामगोपाल वर्माचा पहिला हिंदी चित्रपट ‘शिवा’ ने देश भरात अस्थिरता निर्माण केली होती.या चित्रपटात एका विद्यार्थ्याच्या कॉलेज आयुष्याचे प्रत्येक पैलूंना दर्शविण्यात आले होते, की कसे कॉलेजच्या एका सामान्य विद्यार्थ्याला तेथील राजकारण आणि गुंडागर्दीशी जुळवून घेतले जाते. विशेष म्हणजे या चित्रपटात कॉलेज मध्ये होणाºया विद्यार्थ्यांच्या निवडणूकीत हस्तक्षेप करणारे राजकीय पक्ष आणि नेतांपासून ते अपराधी संघटनांचे चेहरे उघड करण्यात आले होते.‘शिवा’ नंतर या यादीत मणिरत्नमचा चित्रपट ‘युवा’चे नाव येते, ज्यात अजय देवगन एका कॉलेज लीडरच्या रोल मध्ये होते. अनुराग कश्यपच्या ‘गुलाल’ चित्रपटात कॉलेजमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी कसे हातखंडे वापरले जातात आणि त्यांचे राजकीय पक्षाशी संबंध कसे प्रस्थापित होतात, हे दर्शविण्यात आले होते. आताच प्रदर्शित झालेला आनंद एल रॉयचा चित्रपट ‘राझंणा’ मध्ये बनारसची प्रेम कथा होती, तर दिल्लीच्या विद्यार्थ्यांचे राजकारणदेखील जोडण्यात आले होते. अभय देओलने या चित्रपटात विद्यार्थी संघटनाच्या नेत्याची भूमिका केली होती. photo source- zee entertainment