Join us

​Comeback Film !! पूजा भट्ट पुन्हा बनणार ‘Alcoholic’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2017 6:03 AM

पूजा भट्ट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पतरणार आहे. होय, पूजा लवकरच एका चित्रपटात मद्याच्या अधीन गेलेल्या महिला पोलिस अधिका-याची ...

पूजा भट्ट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पतरणार आहे. होय, पूजा लवकरच एका चित्रपटात मद्याच्या अधीन गेलेल्या महिला पोलिस अधिका-याची भूमिका साकारताना दिसेल. पूजाचा हा चित्रपट अभीक बरूआच्या ‘सिटी आॅफ डेथ’ या नॉवेलवर आधारित आहे. चालू वर्षाच्या अखेरिस या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. तूर्तास चित्रपटातील अन्य स्टारकास्ट ठरलेली नाही. पण पूजाची भूमिका पककी आहे. काही दिवसांपूर्वी  पूजा भट्ट ‘सडक’ चित्रपटाच्या सीक्वलमधून पुनरागमन करेल, अशी चर्चा होती.खुद्द पूजा या चित्रपटाबद्दल अतिशय उत्सूक आहे. ती याबद्दल भरभरून बोलली. माझे मित्र कौस्तव नारायण नियोगीने हे नॉवेल मला वाचायला दिले. हे वाचल्यानंतर मी यात एका व्यसनाधिन पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. ही भूमिका माझ्या खºया आयुष्यातील अनुभवांशी मिळती जुळती आहे. मी दीर्घकाळ मद्याच्या आहारी गेले होते. पण आता मी मद्यसेवन कायमचे सोडले आहे. हा चित्रपट दिग्विजय सिंह दिग्दर्शित करणार आहेत. २००१ मध्ये त्यांनी ‘माया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. कथेत काही बदल होण्याची शक्यता आहे.‘सिटी आॅफ डेथ’ ही सोहिणी सेन या महिला पोलिस अधिकाºयाची कथा आहे. ती स्वत: कॅन्सर पीडित आहे आणि तिला मुख्यमंत्र्यांकडून कोलकात्यातील एका व्यापाºयाच्या मुलीच्या हत्येचे प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाठवले जाते.ALSO READ : पूजा भट्टने गेल्या चार महिन्यांपासून मद्याला स्पर्शही केला नाही!!पूजाने २४ डिसेंबर २०१६ रोजी दारूचे व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर तिने नाताळ, नवे वर्ष आणि स्वत:चा वाढदिवस अशा सगळ्या पार्ट्या अल्कोहोल फ्री रूपात साजºया केल्यात. मी ४५ व्या वर्षी दारू सोडली.   मला आणखी १० वर्षे अधिक जगायचे तर दारूचे व्यसन सोडण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, असे पूजा म्हणाली होती.