Join us

कॉमेडियन कपिल शर्माची मोठी फसवणूक, कार डिझायनर दिलीप छाब्रियांवर आरोप, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 4:35 PM

कपिल शर्मा शो मधून सर्वांनाा हसवणाऱ्या कपिल शर्माची मोठी फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय

'कपिल शर्मा शो'मधून जगाला हसवणारा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माची मोठी फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय. कपिलने कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. कपिलचा आरोप आहे की, त्याने दिलीपला व्हॅनिटी व्हॅनची ऑर्डर दिली होती. पण दिलीप त्या ऑर्डरची पूर्तता करु शकले नाहीत. वाचा संपूर्ण प्रकरण.

ibc24 ने दिलेल्या वृत्तानुसार, कॉमेडियन कपिल शर्माने कार डिझायनर दिलीप छाब्रियावर आरोप केला की, त्याने कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना व्हॅनिटी व्हॅनची ऑर्डर दिली होती. पण ऑर्डर स्वीकारुनही दिलीपने व्हॅनिटी व्हॅनची डिलिव्हरी केली नाही. याशिवाय डिलिव्हरीसाठी घेतलेले पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे दिलीपने पैसे उकळल्याचा आरोप कपिलने केला आहे.

याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात कपिल शर्माचे प्रतिनिधी मोहम्मद हमीद यांचे जबाब नोंदवले आहेत. कॉमेडियन कपिल शर्माच्या तक्रारीनंतर विशेष पीएमएलए कोर्टाने कार डिझायनर दिलीप छाब्रिया आणि अन्य सहा आरोपींना समन्स बजावले आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने सर्व आरोपींना २६ फेब्रुवारी २०२४ रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान कपिल शर्मा नेटफ्लिक्सवर सुनील ग्रोव्हर आणि इतर सर्व टीमसोबत एक खास कॉमेडी शो आणत असून सर्वांना त्याची उत्सुकता आहे.

टॅग्स :कपिल शर्मा बॉलिवूड