Join us

‘यमला पगला दीवाना फिर से’ने केली निराशा! आता सनी देओल घेऊन येणार अ‍ॅक्शन फिल्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 9:00 AM

आत्तापर्यंत सनी देओल अनेक अ‍ॅक्शनपटात दिसला आहे. यात बेताब, घातक, घायल, जिद्दी, अर्जुन पंडित, त्रिदेव अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

गत शुक्रवारी देओल कुटुंबाचा ‘यमला पगला दीवाना फिर से’ रिलीज झाला. पण श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री’पुढे धर्मेन्द्र, सनी देओल व बॉबी देओलचा हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाला समीक्षक व चाहते कुणालाचेच समाधान करता आले नाही. येत्या काही दिवसांतही हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार काही कमाल दाखवेल, अशी आशा नाही. एकंदर काय तर चित्रपटाला फ्लॉपच्या रांगेत जावून बसण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. यामुळे सनी देओलच्या चाहत्यांची निराशा होणे साहजिकच आहे. पण कदाचित सनी आपल्या चाहत्यांना या स्थितीत बघू शकत नाही. त्यामुळेचं सनीने अशी काही घोषणा केलीय की, त्याचे चाहते खूश होतील. होय, आपण लवकरचं एक अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट घेऊन येणार असल्याचे सनीने म्हटले आहे.

सनी आत्तापर्यंत अनेक अ‍ॅक्शनपटात दिसला आहे. यात बेताब, घातक, घायल, जिद्दी, अर्जुन पंडित, त्रिदेव अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.लवकरच सनी आपला मोठा मुलगा करणला लॉन्च करणार आहे. ‘पल पल दिल के पास’मधून करण बॉलिवूड डेब्यू करतोय. केवळ इतकेच नाही तर करणनंतर लहान मुलगा राजवीर यालाही सनी लॉन्च करणार आहे. अर्थात त्याआधी स्वत:चे काही अ‍ॅक्टिंग प्रोजेक्ट तो पूर्ण करणार आहे.

टॅग्स :सनी देओल