Join us

‘कमांडो ३’ची कमाई १० कोटींच्या घरात; बॉक्स ऑफिसवर ‘बाला’ची जादू कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 17:20 IST

आता हा तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर  पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करू लागले आहेत. ‘कमांडो ३’ची बॉक्स ऑफिसवरची कमाई १० कोटींच्या घरात झाली असून मात्र आयुषमान खुराणाच्या ‘बाला’ चित्रपटाची जादू अजूनही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

‘कमांडो’ चित्रपटाचा तिसरा भाग ‘कमांडो ३’च्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विद्युत जामवाल आणि अदा शर्मा यांची जोडी नेहमीच पे्रक्षकांना भूरळ घालते. आता हा तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर  पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करू लागले आहेत. ‘कमांडो ३’ची बॉक्स ऑफिसवरची कमाई १० कोटींच्या घरात झाली असून मात्र आयुषमान खुराणाच्याबाला’ चित्रपटाची जादू अजूनही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ‘कमांडो ३’ चित्रपटाने शुक्रवारी ४.७४ कोटींची कमाई केली. दुसऱ्याच दिवशी हा आकडा २० टक्कयांनी वाढला. हा आकडा वाढून ५.६४ कोटींपर्यंत पोहोचला. दोन्ही दिवसांत मिळून या चित्रपटाची कमाई १० कोटींच्या घरात गेली असल्याचे समजतेय. एकंदर काय कमांडा ३ ची जादू प्रेक्षकांना भूरळ घालत आहे. 

‘कमांडो ३’ शिवाय इतर काही चित्रपटांचे कलेक्शन पाहिले तर आपल्याला कळेल की, दुसऱ्या दिवशी ‘होटल मुंबई’ या चित्रपटाने १.७० कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे आयुषमान खुरानाचा ‘बाला’ चित्रपट अजूनही जोरदार कमाई क रत असल्याचे चित्र आहे. चार आठवड्यात या चित्रपटाने १११.८८ कोटींची  कमाई केली आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांच्या ‘मरजावाँ’ या चित्रपटाने दोन आठवड्यात ४६.४४ कोटींची कमाई केली आहे.      

टॅग्स :आयुषमान खुराणाकमांडो ३बाला