Join us

कमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 19:26 IST

कमांडो 3 च्या पोस्टरमध्ये विद्युत जामवाल, अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन दैविया यांचा एक वेगळाच अंदाज सगळ्यांना पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देअतिशय चिडलेल्या नायकाच्या भूमिकेत आपल्याला विद्यूतला पाहायला मिळणार हे चित्रपटाचे पोस्टर पाहून आपल्या लक्षात येत आहे. 

कमांडो या प्रसिद्ध चित्रपटाचा तिसरा भाग असलेला कमांडो 3 या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून यात विद्युत जामवाल, अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन दैविया यांचा एक वेगळाच अंदाज सगळ्यांना पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

विद्यूत जामवालचा या चित्रपटात काय लूक असणार हे या चित्रपटाच्या पोस्टरवरून आपल्याला कळत आहे. अतिशय चिडलेल्या नायकाच्या भूमिकेत आपल्याला त्याला पाहायला मिळणार हे चित्रपटाचे पोस्टर पाहून आपल्या लक्षात येत आहे. 

भ्रष्टाचाराला रामराम ठोकत भावना रेड्डी आता एक नव्या मिशनच्या कामाला लागली आहे. ती या भागात देखील पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत आहे. अदा शर्माचा हा धडाकेबाज अंदाज तिच्या चाहत्यांना आवडणार यात काही शंका नाही. कमांडो या चित्रपटाच्या याआधीच्या भागात देखील अदा याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती.

मल्लिका सूड ही ब्रिटनची असली तरी तिला भारताबद्दल प्रचंड प्रेम आहे. मल्लिकाचा या मिशनमध्ये नव्याने समावेश झाला आहे. मल्लिका देखील पोलिसाच्या भूमिकेत असून ही भूमिका अंजिरा साकारणार आहे. ती या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे.

गुलशनचे एक वेगळे रूप त्याच्या फॅन्सना या चित्रपटात पाहायला मिळत आहे. 

 

टॅग्स :कमांडोविद्युत जामवाल